Homeताज्या बातम्याविदेश

शाहीन आफ्रिदी दुसऱ्यांदा अडकणार विवाह बंधनात!

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी हा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशा हिच्याबरोबर दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. इनसाईड स्पोर्ट्सच्या व

बुद्धिबळ वर्ल्डकपमध्ये भारताचा डंका 
न्यूझीलंडला ‘गिल’ वादळाचा तडाखा
माजी क्रिकेटपटू अंशुमान गायकवाड यांचे निधन

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी हा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशा हिच्याबरोबर दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. इनसाईड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, आशिया चषक २०२३ च्या फायनलनंतर २ दिवसांनी म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी हे जोडपे पाकिस्तानमध्ये दुसऱ्यांदा लग्न करणार आहेत. शाहीन सध्या सुरू असलेल्या आशिया चषक २०२३ मधील सुपर ४ सामन्यांसाठी श्रीलंकेत आहे. २३ वर्षीय शाहीन हा सध्या आशिया चषकामध्ये तीन सामन्यात ७ विकेट्स घेऊन दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी ही आपण भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाहिली आहे.भारताच्या धडाकेबाज फलंदाजना अवघ्या ३५ धावा देत त्याने ४ बळी घेतले होते. पावसाने सामन्यात अडथळा आणला नास्ता तर ही मॅच पाकिस्तानने खिशात घातली असती असं म्हणायला हरकत नाही.आता पुन्हा एकदा १० सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. यात पाकिस्तान आफ्रिदीच्या खेळाकडे लक्ष लावून असेल तर भारतीय फलंदाजांना यावेळेस आफ्रिदीच्या गोलंदाजीला चकवा देता येतोय का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पाकिस्तान यंदा फायनलपर्यंत जाण्याच्या तयारीतच आले असल्याचे म्हणता येईल कारण त्यानुसारच आफ्रिदीने आपल्या दुसऱ्यांदा होणाऱ्या लग्नाच्या तारखा ठरवल्या आहेत

COMMENTS