Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वतःच्याच कारखान्यात यंत्रमागात साडी अडकून महिला ठार

मालेगाव प्रतिनिधी - यंत्रमागावर तयार होणाऱ्या कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मालेगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यंत्रमागात अडकून एका

यात्रेनिमित्त जोतिबा डोंगर गुलालाने न्हाऊन निघाला
भूमाता फाउंडेशनच्या वतीने मुस्लिम महिलांना साडी वाटप
देवदर्शन करुन परतताना ऑटोला ट्रकची धडक, एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

मालेगाव प्रतिनिधी – यंत्रमागावर तयार होणाऱ्या कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मालेगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यंत्रमागात अडकून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार मालेगावात घडला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे स्वतःच्याच कारखान्यात या महिलेचा भीषण मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे. पावरलूमच्या तराशण यंत्रात ओढणी अडकून सादिया इसाक अहमद या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना नाशिकच्या मालेगावातील बडा कब्रस्थान भागात समोर आली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे स्वतःच्याच कारखान्यात ही महिला तराशण मशीनवर काम करीत असताना रात्री उशिरा ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यंत्रमागासाठी धागा भरण्याच्या तराशण यंत्रामध्ये ओढणी अडकून झालेल्या दुर्घटनेत सादिया इसाक अहमद या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत सादिया इसाक अहमद यांचा स्वतःच्या यंत्रमाग कारखाना आहे. गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजेण्याच्या सुमारास त्या तराशण मशीनवर काम करत होत्या. त्यावेळी त्यांच्या साडीचा पदर मशिनमध्ये अडकून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्या. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. यंत्रमाग हा मालेगावचा प्रमुख व्यवसाय असून, अनेक गोरगरीब महिला तराशण भरण्याच्या कामासाठी जातात. ताराशण पट्ट्यात ओढणी व किंवा साडी अडकून महिला गंभीर जखमी होतात. अनेकदा बळी देखील जातो. वर्षभरात अशा 8 ते 10 दुर्घटना होऊन कुटुंब उघड्यावर येत आहेत. या दुर्घटना टाळण्यासाठी काम करणाऱ्यांकडून कारखानदारांनी ऑटो कट व सेन्सर असलेल्या मशीन खरेदी करण्याची मागणी होत आहे.

COMMENTS