Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीत पक्ष आणि चिन्हासाठी संघर्ष

अजित पवार गटाचे दावे शरद पवारांनी फेटाळले

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः शिवसेना नेमकी कुणाची यानंतर आता राष्ट्रवादी काँगे्रस नेमकी कुणाची असा सवाल आता उपस्थित होत आहे. राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये

मुंबईत सरपंच संघटनेचे विविध मागण्यासाठी आंदोलन
समाजाशी दगाफटका केल्यास जड जाईल
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः शिवसेना नेमकी कुणाची यानंतर आता राष्ट्रवादी काँगे्रस नेमकी कुणाची असा सवाल आता उपस्थित होत आहे. राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला आहे, तर दुसरा गट शरद पवारांसोबत कायम राहिला आहे, त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हांसाठी दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाचे दार ठोठावले आहे.

राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी निवडणूक आयोगाकडे आपले उत्तर दाखल केले असून, यात त्यांनी अजित पवार गटाचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. मंत्र्यासोबत अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांविरोधातही शरद पवार गटाने अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. 9 मंत्र्यासोबत 31 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. यातील विधानपरिषदेचे आमदार असल्याची माहिती आहे. आता शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसची लढाई आता निवडणूक आयोगासमोर सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आतापर्यंत एकूण आमदारांपैकी किती आमदार अजित पवार यांच्याकडे आणि किती शरद पवार यांच्याकडे हा आकडा स्पष्ट झालेला नव्हता तो आता समोर आला आहे. आतापर्यंत दोन्ही गटाकडून आकडेवारी जाहिर करण्यात आलेली नव्हती. मात्र निवडणूक आयोगासमोर याचिका दाखल करताना शरद पवार गटाने 9 मंत्र्यांसोबतच 31 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्याशिवाय यातले चार विधान परिषद आमदार असल्याची माहिती समोर आली आहे. तर अजित पवार गटाकडून करण्यात आलेले सर्व दावे शरद पवार गटाने फेटाळले आहे. अजित पवारांनी आपण राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा, पक्ष आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला होता तो शरद पवार गटाने फेटाळला आहे. 2022 मध्ये पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी झाली होती त्याची देखील काही पुरावे देण्यात आल्याची माहिती आहे.

पक्ष आणि चिन्ह निसटण्याची भीती ः जयंत पाटील – ठाकरे गटाची जी अवस्था झाली, तीच अवस्था राष्ट्रवादी काँगे्रसची होवू शकते, कारण राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष आणि पक्षाचे घडयाळ चिन्ह अजित पवार गटाला शिवसेनेप्रमाणे मिळू शकते, अशी भीतीच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर त्यांचे पक्ष व निवडणूक चिन्ह बंडखोर गटाला मिळाले. जे शिवसेनेसोबत घडले, तेच राष्ट्रवादी काँग्रेससोबत घडले तर नवल नाही. आमचे नाव व चिन्ह जाईल असे वाटत आहे. ते दुसर्‍यांना देऊन पुन्हा शिवसेनेसारखी स्थिती निर्माण केली जाऊ शकते, असे जयंत पाटील म्हणाले.

31 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका – शिवसेनेसारखाच वाद आता राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभा राहिला आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून पक्षावर दावा ठोकला जात असतानाच शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला उत्तर दाखल केले आहे. या उत्तरात अजित पवार गटाने केलेले सगळे दावे फेटाळण्यात आले आहेत. तसेच सत्तेत सहभागी झालेल्या मंत्र्यांसह अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांविरोधात अपात्रतेची याचिकाही दाखल करण्यात आली आहे. नऊ मंत्र्यांशिवाय 31 आमदारांच्या विरोधातही अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे.

COMMENTS