Homeताज्या बातम्याविदेश

जपानची चंद्राकडे झेप ! पहाटेच लाँच केलं रॉकेट

जपान प्रतिनिधी - जपानच्या चांद्र मोहिमेची तयारी गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. आता जपानने चंद्राकडे झेप घेतली आहे. जपानने चंद्रावर एक ए

जिओने आणला क्रिकेट रसिकांसाठी नवीन रिचार्ज प्लॅन
भोंगा वाजला की टीव्ही-मोबाईलसह इंटरनेट होणार बंद : वहागाव ग्रामपंचयातीचा निर्णय
नक्षलग्रस्त भागात गडचिरोली पोलीस दलाचे कार्य कौतुकास्पद : ना. शंभूराज देसाई

जपान प्रतिनिधी – जपानच्या चांद्र मोहिमेची तयारी गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. आता जपानने चंद्राकडे झेप घेतली आहे. जपानने चंद्रावर एक एक्स-रे टेलिस्कोप आणि एक छोटं लँडर पाठवलं आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जपान पाचवा देश ठरणार आहे. भारतीय वेळेनुसार आज पहाटे 5:12 वाजता H2-A रॉकेटसोबत जपानने दोन अंतराळ यान लाँच केले. भारताने काही दिवसांपूर्वीच चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडली. त्यानंतर आता जपानने चंद्राकडे झेप घेतली आहे. दोन टप्प्यांमध्ये टेलिस्कोप आणि लँडर रॉकेटपासून वेगळे झाले. आता या दोघांना चंद्रावर पोहोचण्यासाठी सुमारे चार महिन्यांचा वेळ लागणार असल्याची माहिती मिळत आहे..

COMMENTS