Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वांद्रे-कुर्ला संकुलातील भूखंडांच्या ई-लिलावाची प्रक्रिया रखडली

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील वाणिज्य वापराचे आरक्षण असलेल्या दोन भूखंडांच्या ई

गुड फ्रायडेनिमित्त येशूंच्या मानवतावादी विचारांचे स्मरण : अजित पवार
वीजचोरी प्रकरणी दोन वर्षाचा तुरुंगवास; अहमदनगर न्यायालयाचा निकाल
खटाव तालुक्यात गौण खनिज उत्खनन प्रकरणी जेसीबीसह दोन ट्रॅक्टरवर कारवाई

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील वाणिज्य वापराचे आरक्षण असलेल्या दोन भूखंडांच्या ई – लिलावासाठी मेमध्ये निविदा मागविल्या होत्या. मात्र अद्याप ही निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. एमएमआरडीए वारंवार या निविदेला मुदतवाढ देत आहे. त्यामुळे ई-लिलाव रखडला आहे.
एमएमआरडीएच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत भूखंड विक्री असून या भूखंड विक्रीच्या रक्कमेतून आतापर्यंत एमएमआरडीएने अनेक प्रकल्प उभारले आहेत. मात्र मागील काही वर्षात उत्पन्नाचा हा स्रोत आटला आहे. भूखंडांची विक्री अनेक कारणांनी रखडली आहे. असे असताना एमएमआरडीए कोटीवधी रुपये खर्चाचे प्रकल्प राबवत असून एमएमआरडीएची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. कर्ज उभारणीतून प्रकल्प राबिवले जात आहे. ही स्थिती बदलण्यासाठी आता एमएमआरडीएने पुन्हा भूखंड विक्रीस प्राधान्य दिले आहे. त्यानुसार सी 44 आणि सी 48 हे दोन भूखंड विक्रीसाठी काढले आहेत. मात्र या भूखंडांची विक्री प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. असे असले तरी बीकेसीतील आणखी नऊ भूखंड विकण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. या नऊपैकी दोन भूखंडांसाठी मेमध्ये निविदा काढण्यात आल्या आहेत. बीकेसीतील जी ब्लॉकमधील ‘सी 13’ (7071.90 चौ.मी.) आणि ‘सी 19’ (6096.67 चौ.मी.) या दोन भूखंडांच्या ई लिलावासाठी मेमध्ये निविदा मागविण्यात आल्या होत्या या भूखंडांच्या लिलावासाठी तीन लाख 44 हजार 500 रुपये प्रति चौरस मीटर असे राखीव दर निश्‍चित करण्यात आले आहेत. या दोन्ही भूखंडांच्या ई लिलावातून 2928.25 कोटी रुपये वा त्याहून अधिक रक्कम मिळण्याची शक्यता आहे. पण प्रत्यक्षात मात्र ई लिलाव प्रक्रियाच पूर्ण झालेली नाही. निवाद सादर करण्यासाठी 17 जुलै, 9 ऑगस्ट आणि 4 सप्टेंबर अशा अंतिम तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र तिन्ही वेळी निविदेला मुदतवाढ देण्याची नामुष्की एमएमआरडीएवर ओढवली. आता इच्छुकांना 29 सप्टेंबरपर्यंत निविदा सादर करता येणार आहे.

COMMENTS