नाशिक प्रतिनिधी - शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या नियोजित नासिक जिल्हा दौर्याच्या प्रसंगी प्रथम नासिक जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात जिल्हा पदा
नाशिक प्रतिनिधी – शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या नियोजित नासिक जिल्हा दौर्याच्या प्रसंगी प्रथम नासिक जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात जिल्हा पदाधिकार्यांन समवेत भाऊ चौधरी यांची महत्त्वपुर्ण बैठक झाली.सचिव भाऊ चौधरी यांचे समवेत मुंबईहुन आलेले खा.श्रीकांत शिंदे फाऊंडेंशन मध्ये काम करणारे व शासकिय योजनांची महत्त्वाची माहीती देणारे अनिल घुगे हे होते. यावेळी जिल्हा पदाधिकारी बैठकीत शासकिय योजनांची माहीती संपुर्ण जिल्ह्यात कशा प्रकारे राबवावी,शासकिय योजना कोणत्या व त्या प्रभावीपणे राबवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागता, तसेच बचत गटासाठी महीलांना योजना,वयोरुध्द नागरीकांना नव्यानेच आलेली योजना, ज्यात वयोरुध्दांना श्ववण यंत्र व अन्य साहीत्य देणे या योजनांची माहीती अनिल घुगे यांनी दिली.
यावेळी नासिक लोकसभेचे खासदार मा.हेमंत गोडसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी शहरात राबविण्यात येणार्या योजना व पक्षिय कामकाज याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात सांगितले कि,येत्या दहा दिवसात सर्व नेमणुका पुर्ण करुन एक महीन्यात शिवसेनेची भरभक्कम बांधनी शहरात, ग्रामीण भागात मुंबई,ठाण्यासारखी झाली पाहीजे.पदाधिकारी हा वेळ देणारा असावा.नुसताच पदाला चिकटलेला नसावा.पक्ष संघटनेच्या कामासाठी प्रत्येक विधानसभेत एक शिवसेनेचे संपर्क कार्यालय असावे असा मानस खा.श्रीकांत शिंदे साहेब आणि आमचा आहे.यावेळी नासिक लोकसभेतील ६६ शाखाप्रमुखांना, सचिव भाऊसाहेब चौधरी व खा.हेमंतआप्पा गोडसे यांचे हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी संपर्कप्रमुख सुनील पाटील, सहसंपर्कप्रमुख राजुनाना लवटे ,माजी आमदार काशीनाथ मेंगाळ ,गणेश कदम ,जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, भाऊलाल तांबडे, महानगरप्रमुख प्रविण तिदमे,उपजिल्हाप्रमुख अमोल सुर्यवंशी ,तालुकाप्रमुख ईगतपुरी,संपत काळे,त्र्यंबकेश्वर संपत काळे,दिंडोरी अमोल कदम ,युवासेना विस्तारक योगेश बेलदार,युवासेना जिल्हाप्रमुख रुपेश पालकर,शिवसेना उपमहानगरप्रमुख उमेश चव्हाण, मनिष खिले, शिवा ताकाटे ,आनंद फरताळे,शिवाजी भोर ,झोपडपट्टी कामगार सेना जिल्हाध्यक्ष भिवानंद काळे, सनी रोकडे,दिलीप आहिरे ,अशोक निकम, महीला आघाडी जिल्हा संघटक मंगलाताई भास्कर, श्यामलाताई दिक्षित, अस्मिता, देशमाने, ज्योती कड तसेच अंगिकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
COMMENTS