Homeताज्या बातम्यादेश

विक्रम लँडरचे चंद्रावर दुसर्‍यांदा सॉफ्ट लँडिंग

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने पुन्हा एकदा चांद्रयान-3 मोहिमेत यश मिळवले आहे. विक्रम लँडरने चंद्रावर दुसर्‍या

चांद्रयानानंतर आता समुद्रयान मिशन!
इस्त्रो चंद्रावर पाठवणार माणूस
पुणे प्रादेशिक विभागात एकाच दिवशी दोन कोटींच्या वीजचोर्‍या उघडकीस

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने पुन्हा एकदा चांद्रयान-3 मोहिमेत यश मिळवले आहे. विक्रम लँडरने चंद्रावर दुसर्‍यांदा सॉफ्ट लँडिंग केले. या प्रयोगासाठी विक्रम लँडरचे इंजिन पुन्हा सुरू करण्यात आले. नंतर लँडर चंद्राच्या जमिनीवरून चाळीस सेमी उंच उडाले आणि पुन्हा खाली येऊन स्थिरावले. भविष्यात चंद्रावरचे नमुने घेऊन यानाला पृथ्वीवर यायचे असेल तर ते शक्य आहे का याची चाचणी या निमित्ताने घेण्यात आली.
प्रयोग यशस्वी झाला असून विक्रम लँडरची सर्व उपकरणे दुसर्‍यांदा सॉफ्ट लँडिंग केल्यानंतरही व्यवस्थित कार्यरत आहेत. विक्रम लँडरने चंद्राच्या जमिनीवरून उड्डाण करण्याआधी चेस्ट, इलसा ही उपकरणे बंद केली होती आणि प्रज्ञानला बाहेर काढणारा रँप गुंडाळला होता. दुसर्‍यांदा सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर चेस्ट आणि इलसा ही उपकरणे पुन्हा सुरू करण्यात आली. रँप पण आधी होता तसाच बाहेर काढून ठेवण्यात आला आहे. सध्या चंद्रावर रात्र सुरू आहे. प्रज्ञान रोव्हर ‘स्लीप मोड’वर आहे. रोव्हरवरची इलेक्ट्रॉनिक आणि वैज्ञानिक उपकरणे बंद आहेत. रात्रीच्या वेळी चंद्रावर कडाक्याची थंडी पडते. या वातावरणात टिकाव धरला तर सूर्योदय झाल्यावर रोव्हर पुन्हा कार्यरत होण्याची शक्यता आहे. चंद्रावर सूर्योदय होताच प्रज्ञान रोव्हरचे सोलर पॅनल पुन्हा ऊर्जा ग्रहण करेल. यानंतर रोव्हर पुन्हा कार्यरत होतो का याकडे अनेकांचे लक्ष आहे. चंद्रावर आता 22 सप्टेंबर रोजी सूर्योदय होईल. यावेळी रोव्हर पुन्हा कार्यरत झाले तर इसरोसाठी आणखी संशोधन करू शकेल. रोव्हर सुरू झाले नाही तर तो भारताचा प्रतिनिधी म्हणून कायमचा चंद्रावर रहणार आहे.

COMMENTS