Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपघातात शिक्षक पती-पत्नीचा मृत्यू

नांदेड-हिंगोली मार्गावरील घटना

हिंगोली/प्रतिनिधी ः राज्यात अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत असून, रविवारी सकाळी हिंगोली-नांदेड मार्गावर भरधाव कार डिव्हायडरला धडकल्याने भीषण अपघात

गुजरातमध्ये कार-बसच्या धडकेत नऊ जणांचा मृत्यू
शेतमजुरांना नेणारा पिकअप उलटला.
दुर्देवी ! लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या वाहनाला अपघात .

हिंगोली/प्रतिनिधी ः राज्यात अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत असून, रविवारी सकाळी हिंगोली-नांदेड मार्गावर भरधाव कार डिव्हायडरला धडकल्याने भीषण अपघात झाला असून या अपघात शिक्षक पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा अपघात रविवारी पहाटे या मार्गावरील कळमनुरी शहरानजीक घडला.
जयप्रकाश कावरखे, मंजुषा कावरखे असे या अपघात मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षक पती-पत्नीचे नाव आहे. तर पराग कावरखे असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. हे तिघेही नांदेडहून कळमनुरीच्या दिशेने निघाले होते. कळमनुरी इथे त्याचे कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. यात गाडीचा चक्काचूर झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात शिवनी फाट्याजवळ कावरखे यांची कार डिव्हायडरला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, यानंतर कार तीन चार वेळा पलटी झाली. यानंतर कार रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली. या अपघात कारचा चक्काचूर झाला. त्यामुळे कावरखे पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्यांचा मुलगा हा कर चालवत होता. मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली ते नांदेड महामार्गावरुन जात असतांना कावरखे यांच्या गाडीवरील नियंत्रण सुटले. यावेळी त्यांची कार डिव्हायडरला धडकली. ही धडक एवढी भीषण होती की झाला. या अपघातात शिक्षक दाम्पत्य जागीच ठार झाले तर त्यांचा मुलगा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाल्यावर स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने दवाखान्यात भरती केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता.

COMMENTS