Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला येलो अलर्ट

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा हैराण झाला होता, अखेर राज्यात पावसाने पुनरागमन केल्यामुळे शेतकरी

माण तालुक्यातील सोन्या-छब्या बैल जोडीचा लंम्पीमुळे मृत्यू
नेवासा येथे जागतिक दर्जाचा संत ज्ञानेश्वर सृष्टी प्रकल्प उभारणार: पालकमंत्री विखे
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल हॅक

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा हैराण झाला होता, अखेर राज्यात पावसाने पुनरागमन केल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला असला तरी अनेक जिल्ह्यात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. मात्र आगामी 48 ते 72 तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात शनिवारपासून पावसाला सुरूवात झाली आहे. कोकण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मुसळधार ते मध्यम पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. तर पुढील 48 ते 72 तासांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आला.  रविवारी विदर्भात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो दक्षिण कर्नाटकापर्यंत आहे. तसेच रविवारी उत्तर बंगाल उपसागराच्या किनार्‍यावर चक्रीय स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याच परिसरात येत्या 48 तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात 4 तारखेनंतर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर संपूर्ण राज्यात मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. आज आणि उद्या म्हणजे 3 आणि 4 सप्टेंबरला मध्य महाराष्ट्रात, तर 4 आणि 5 सप्टेंबरला मराठवाड्यात, 5 आणि 6 तारखेला विदर्भातील तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे, यामुळे या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय. पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील 5 ते 6 दिवस ढगाळ वातावरण असेल. तसेच हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या परिसरात 2 आणि 3 सप्टेंबरला घाट विभागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून येथे येलो अलर्ट देण्यात आला आहे. शनिवारी दिवसभरात कोल्हापूर, रायगड, सांगली, पुणे या जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पाऊस झाला. राज्यात 24 तासात लोणावळा येथे 105 मिमी, तर चिंचवड येथे 83 मिमी पावसाची नोंद झाली.

COMMENTS