पारनेरच्या तहसीलदारांना खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पारनेरच्या तहसीलदारांना खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पारनेर तालुक्यातील धोत्रे येथील सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरणाऱ्या अरुण रोडे यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांना खंडणी उकळण्याचे उद्येशाने 50 हजार रुपये खंडणीची मागणी करुन 30 हजार रुपये खंडणी स्वीकारलेली तसेच गुन्हा दाखल केल्यास  गुन्ह्यातून सुटून आल्यावर  जिवानिशी मागे लागतो अशा प्रकारची धमकी दिली त्या विरोधात तहसीलदार ज्योती देवरे यांनी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून अरुण रोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्वातंत्र्यदिनापासून रात्री 10 पर्यंत स्वातंत्र्य…करा मजा…; नगर जिल्ह्यातील लॉकडाऊन अखेर शिथील, मंदिरे व सिनेमागृहे मात्र राहणार बंद
मुख्यमंत्री सडक योजनेसाठी खर्च होणार 65 कोटी
प्रज्वल ढाकणे यांना सामाजिक जाणिवेचा पुरस्काराने सन्मानित

पारनेर प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील धोत्रे येथील सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरणाऱ्या अरुण रोडे यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांना खंडणी उकळण्याचे उद्येशाने 50 हजार रुपये खंडणीची मागणी करुन 30 हजार रुपये खंडणी स्वीकारलेली तसेच गुन्हा दाखल केल्यास  गुन्ह्यातून सुटून आल्यावर  जिवानिशी मागे लागतो अशा प्रकारची धमकी दिली त्या विरोधात तहसीलदार ज्योती देवरे यांनी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून अरुण रोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की पारनेर जी.अहमदनगर येथे मागील दीड वर्षापासुन तहसीलदार म्हणुन काम पाहते.सदर दिड वर्षापासुन सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असुन सदर प्रादुर्भाव रोखणे यां कामासोबतच मला शासनाने तहसीलदार म्हणुन नेमुन दिलेली शासकीय कामे करावी लागतात.ज्यामध्ये महसुल क्षेत्रातील सर्व कामे,गौणखनीज चोरी रोखणे तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीसांना मदतीस घेवुन करावी लागतात.सन 2021 साली कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट आली त्यावेळी बरीच जीवीत हानी झाली.एखादा कोरोनाग्रस्त रुग्ण दगावल्यास त्याचे कोणी नातेवाईक हे देखील त्याचेजवळ येत नाहीत.मागील दोन महीन्यापुर्वी एक व्यक्ती अशीच कोरोनाने दगावली त्यावेळी त्याचे नातेवाईक मुले ही बाहेरगांवी होते. त्यांना माहीती देऊन देखील ते लवकर येवु शकले नाहीत.व सदर प्रेत हे कोरोना रुग्णाचे असलेने व ते जास्त वेळ ठेवता येत नसलेने मी तहसीलदार या नात्याने सदर प्रेतास अग्नीडाग देऊन अंत्यविधी केला होता. त्यानंतर स्थानीक वृत्त पत्र प्रतीनिधी अरुण आंधळे यांनी सोशल मिडीया व वृत्त्पत्रात सदरची बातमी ही मी प्रसीध्दीसाठी सदरचा अंत्यविधी केला अशी प्रसारीत केली त्यावेळी सदरची बातमी ही अरुण रोडे यांनी तालुक्यातील सोशल मिडीया ग्रुपवर प्रसीध्दीस दिली. तसेच माझेविषयी माझे वरीष्ठांकडे तक्रारी केल्या. 14.06.2021 रोजी मी पारनेर हद्यीमध्ये गौणखनीजा बाबत कारवाई केलेले वाहन सोडुन देण्यासाठी मी कारवाई केलेनंतर दुपारचे वेळेस अरुण रोडे हे माझे दालनांत तहसील कार्यालयांत आले व त्यांनी मला सदरचे वाहन हे माझा मित्र राजु पाचारणे याचे आहे ते सोडुन दया असे सांगीतले मी सामाजिक कार्यकर्ता आहे तेवढे वाहण सोडुन दया. मग मी तुमच्या विरुदध सर्व माहिती अधिकार अर्ज व वरिष्ठांकडे केलेले तक्रार अर्ज काढुन घेईल असे म्हणाला.त्यानंतर अरुण रोडे यांनी माझेकडे तुमचेविरुध्द वरीष्ठांकडे केलेल्या तक्रारी परत घेतो तुम्ही मला 50 हजार रुपये दया असे हस्ते परहस्ते सांगीतले. तेव्हा मी दुसरीकडुन माहीती आलेली असलेने दुर्लक्ष केले. एके दिवशी अरुण रोडे हे माझे कार्यालयांत आले असता मी त्यांना मी काय चुक केले तुम्ही माझे विनाकारण बातम्या टाकुन बदनामी का करता अशी विचारणा केली असता त्याने मी सामाजीक काम करतो.अरुण आंधळे हे बातम्या छापतात व धोंडीबा जबाजी शेटे हे तक्रार अर्ज करतात व पैसे घेवुन मिटवत असतात तसे मी काम करत नाही. मी आलेले पैसे सामाजीक कामासाठीच खर्च करतो असे सांगीतले. तेव्हा मी त्यांना मी गरीब आहे,मी कांही चुकीचे काम करत नाही मी तुम्हाला 50 हजार रुपये देऊ शकत नाही असे म्हणाले असता अरुण रोडे म्हणाले की,तुम्ही मला 10 हजार रुपये कमी दया 40 हजार रुपयेच दया मी तुमच्याविरुध्द दिलेल्या सर्व तक्रारी माझे अन्याय निर्मुलन सेवा समितीच्या लेटर पॅडवर लिहुन देऊन तक्रारी मागे घेतो. त्यावर त्यांना मी एवढे पैसे देऊच शकणार नाही असे म्हणाले असता त्यांनी मॅडम तुम्हाला जे काय दयायचे आहेत ते दया मलाही माझे सामाजीक कार्यकर्ते सांभाळावे लागतात. 

माझा दररोजचा खर्च 2 हजार रुपये आहे वेगवेगळया अधिका-यांचे तक्रार अर्ज लिहणे झेरॉक्स करणे व देणे दयावे लागत आहे. असे म्हणालेने मी ठीक आहे पाहते असे म्हणाले. त्यानंतरही रोडे यांनी माझेकडे दोन तीन वेळेस पैशाची मागणी केली. त्यामुळे मी सदरची माहीती पोलीसांना दिली. तेव्हा त्यांनी अरुण रोडे यांनी परत पैसे मागीतले तर तुम्ही त्याला पैसे देण्यापुर्वी पोलीसांना माहीती दया असे सांगीतले. दि. 21 रोजी दुपारी 3 वाजण्याचे सुमारांस मी तहसील कार्यालय पारनेर येथील माझे दालनात असतांना अरुण रोडे हे माझे दालनात आले व त्यांनी माझेकडे पुन्हा पैशाची मागणी केली तेव्हा मी त्यांना ठीक आहे मी पैसे एका पिशवीत ठेवते तुम्ही घेवुन जा असे समोर पैसे देणे योग्य नाही असे म्हणाले तेव्हा त्याने ठीक आहे असे म्हणुन तो बाहेर गेला त्यावेळेत मी पोलीसांना माहीती दिली व बोलावून घेतले. व तीस हजार रुपये एका काळया रंगाच्या गितुज कलेक्शन असे इंग्रजीमध्ये लिहलेल्या प्लॅस्टीकचे पिशवीत ठेवुन पिशवी टेबलवर ठेवले. थोड्याच वेळांत अरुण रोडे हे पुन्हा दालनात आले तेव्हा मी त्यांना पिशवीत पैसे ठेवलेले आहेत,तुम्हाला मोजुन पाहायचे असतील तर पाहुन घ्या असे म्हणाले. तेव्हा अरुण रोडे यांनी मी बाहेर जावुन पैसे मोजतो असे म्हणुन पैसे असलेली प्लॅस्टीकची पिशवी घेवुन ते दालनाबाहेर निघत असतांनाच मी पोलीसांना इशारा देऊन कळवले असता पोलीसांनी त्यास पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतले आहे.व त्यानंतर लागलीच मी पोलीस ठाण्यात येऊन मी माझे शासकीय कर्तव्य करत असतांना माझेविषयी बदनामीकारक मजकुर पसरवुन व त्याची वरीष्ठाकडे तक्रार करण्याची भिती दाखवुन मला धमकी देऊन माझेकडुन खंडणी उकळण्याचे उद्येशाने माझेकडे 50 हजार रुपये खंडणीची मागणी करुन 30 हजार रुपये खंडणी स्वीकारलेली आहे. त्यानंतर त्यांनी मला धमकी दिली की, माझ्यावर जर गुन्हा दाखल केला तर मी गुन्हयातुन सुटुन आल्यनंतर जिवनाशी त्याचे मागे लागतो व मी कोणालाच सोडनार नाही अशा प्रकारची धमकी दिलेली आहे. म्हणुन माझी अरुण रामदास रोडे रा.धोत्रे बा.ता.पारनेर याचे विरुदध कायदेशीर फिर्याद आहे. असे फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले आहे त्यानुसार पारनेर पोलीस स्टेशनमध्ये अरुण रोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS