Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बच्चू कडू आक्रमक! सचिन तेंडुलकरच्या घरासमोर जोरदार आंदोलन

मुंबई प्रतिनिधी - प्रहारचे आमदार बच्चू कडूसध्या मुंबईत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या घराबाहेर आंदोलन करत आहेत. सचिन ऑनलाईन गेमिंगची जाह

मृत हरणांना प्राणी मित्रांनी वाहिली श्रद्धांजली
बचत योजनांवरील व्याजावरून केंद्राचे घूमजाव ; नजर चुकीने आदेश काढल्याची सारवासारव; सरकारवर टीकेची झोड
दुधोडीतील कार्यकर्त्यांचा आ. रोहित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई प्रतिनिधी – प्रहारचे आमदार बच्चू कडूसध्या मुंबईत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या घराबाहेर आंदोलन करत आहेत. सचिन ऑनलाईन गेमिंगची जाहीरात करतो आणि याच मुद्द्यावरुन बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बच्चू कडूंसह आंदोलन करणाऱ्या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, ऑनलाईन गेमिंगची जाहीरात करत असल्याच्या मुद्द्यावरुन बच्चू कडू यांनी यापूर्वीही सचिन तेंडुलकरवर नाराजी व्यक्त केली होती. बच्चू कडू म्हणाले की, “खरं तर आम्हाला बरेच फोन, मेसेज येत आहेत. काही ठिकाणी तर पैसा गुंतवून या जुगारावर लावला आहे. ऑनलाईन गेमिंगची तुम्ही जर जाहीरात करताय, तर मग मटक्याचीही करा, ते कशाला सोडताय? भारतरत्न असल्यामुळे आम्ही आंदोलन करत आहे. ते फक्त क्रिकेटर असते तर आम्ही आंदोलन केलं नसतं. या देशात भगतसिंहांना भारतरत्न मिळाला नाही, अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला नाही, महात्मा फुलेंना मिळाला नाही. मग ज्यांना भारतरत्न मिळाला ते जर गैरफायदा घेत आहेत.”

COMMENTS