Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोतवालची परिक्षा पाच सेंटरवर होणार

1975 अर्जापैकी 1751 अर्ज पात्र तर 224 अर्ज अपात्र

बीड प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाने राज्यभर कोतवाल भरती आयोजित केली आहे, गेल्या अनेक वर्षापासून हजारो प्रलंबित पदासाठी राज्यभर कोतवाल भरती होत आहे

सौदी अरेबियात अमिताभ बच्चन यांनी घेतली मेस्सी-रोनाल्डोची भेट
पंजाबमध्ये मुख्यमंत्री चन्नी यांच्या निकटवर्तीयावर ईडीचे धाडसत्र
नगरकरांनो, काम चालू…स्टेशन रोड राहणार बंद ; उड्डाणपुल व पाईपलाईन कामामुळे रविवारपासून वाहतुकीत होणार बदल

बीड प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाने राज्यभर कोतवाल भरती आयोजित केली आहे, गेल्या अनेक वर्षापासून हजारो प्रलंबित पदासाठी राज्यभर कोतवाल भरती होत आहे बीड साठी तब्बल 1975 अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी 1751अर्ज पात्र झाले तर 224 अर्ज अपात्र झाले आहे. या परीक्षेचा नियोजन पाच सेंटरवर करण्यात आला असून यामध्ये 100 मार्काची लेखी स्वरूपाची परीक्षा होणार आहे. भरती प्रक्रिया उपविभागीय अधिकारी यांच्या निगराणीत होणार आहे.
बीड जिल्ह्यात कोतवाल पदासाठी भरती अर्ज मागविण्यात आले आहे सदरील अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने बीड तहसील कार्यालयात स्वीकृत केले गेले आहेत, जिल्ह्यात एकूण 118 पदासाठी कोतवाल भरती आयोजित केली आहे तर तालुक्यासाठी 27 जागा आहेत यासाठी तब्बल 1975 अर्ज प्राप्त झाले आहेत यामध्ये 18 ते 40 वयोगटातील उमेदवारांनी कोतवाल भरती अर्ज भरला आहे. कोतवालाची परीक्षा बीड मधील पाच सेंटरवर होणारा असून ही परीक्षा लेखी स्वरूपाची 100 मार्काची असणार आहे. ही परीक्षा उपविभागीय अधिकारी यांच्या निगराणीत होत असल्यामुळे या परीक्षेत गोंधळ होऊ शकतो का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासनाकडून दरमहा कोतवाल यांना 15000 रुपये वेतन दिले जाणार आहे. कोतवाल पद हे प्राचीन काळापासून प्रचलित आहे पोलीस प्रमुख म्हणून कोतवाल यांना ओळखले जात असे, गेल्या अनेक वर्षापासून गावातीलकोतवाल पद हे रिक्त असल्याने राज्यभरात महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोतवाल भरती आयोजित केली आहे. यासाठी खुला वर्गाच्या उमेदवाराकडून 500 तर मागासवर्गीय उमेदवाराकडून 400 रूपे शुल्क म्हणून स्वीकारले आहे. कोतवाल पदासाठी बीड जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने उच्च शिक्षित बेरोजगार युवकाकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आले असल्याने बेरोजगारीचा भस्मासुर किती वाढला हे लक्षात येते, बीड येथील तहसील कार्यालयात दहावी ते ग्रॅज्युएट, डीएड , डिप्लोमा, डिग्री असे विविध क्षेत्रात उच्चशिक्षित असलेले बेरोजगार युवक अर्ज भरण्यासाठी झुंबड गर्दी पाहण्यास मिळाली होती.
कोतवाल भरती प्रक्रिया सदोष ?
सध्या महसूल विभागामार्फत कोतवाल भरती करण्यात येत असून यामध्ये गोर गरीबांच्या मुलांनी 500 रुपये फीस भरुन अर्ज केलेले आहेत. मात्र सदरची भरती प्रक्रिया भष्ट्राचार मुक्त होईल का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. भरती प्रक्रियेत समाविष्ट असलेले महसूलच्या जवळपास सर्व कर्मचार्‍यांचे जवळच्या नात्यामधील उमेदवार असून यामध्ये भ्रष्ट्राचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोतवाल भरती प्रक्रिया सदोष होण्याकामी रक्ताच्या नात्यामधील ज्या कर्मचारी यांचे नातेवाईक यांनी अर्ज केला आहे अशा कर्मचार्‍यांना तात्काळा भरती प्रक्रियेमधून हटविण्यात यावेत तरच गोर गरिबांच्या मुलांना न्याय मिळेल.

COMMENTS