भाजप हा कुणालाही त्रास न देणारा पक्षः बापट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप हा कुणालाही त्रास न देणारा पक्षः बापट

’भारतीय जनता पक्ष हा कोणालाही त्रास न देणारा पक्ष आहे. एक गरीब पक्ष आहे. हा पक्ष लोकांना मदत करणारा पक्ष आहे,’ अशी प्रतिक्रिया भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेल्या आरोपांवर दिली आहे.

ईव्हीएम एक ब्लॅक बॉक्स : राहुल गांधी यांचा सवाल
मनोज जरांगेंची ईडीमार्फत चौकशी करा
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात १०० मेगावॅटचा टप्पा पार

पुणे/प्रतिनिधी: ’भारतीय जनता पक्ष हा कोणालाही त्रास न देणारा पक्ष आहे. एक गरीब पक्ष आहे. हा पक्ष लोकांना मदत करणारा पक्ष आहे,’ अशी प्रतिक्रिया भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेल्या आरोपांवर दिली आहे. सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी भाजपशी पुन्हा जुळवून घेण्याची विनंती पक्षप्रमुखांना केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेनेच्या आमदार, खासदारांना दिला जाणारा नाहक त्रास हे कारण त्यासाठी सरनाईक यांनी पुढे केले आहे. युतीच्या नेत्यांचे संबंध अजूनही चांगले आहेत. ते तुटण्याआधी पुन्हा जुळवून घ्या. तसे केल्यास केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणारा त्रास थांबेल, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. 

सरनाईक यांच्या या आरोपांनंतर महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. बापट यांनी मात्र हे सगळेच आरोप फेटाळून लावले आहेत. ’सरनाईक यांना भाजपकडून कुठलाही त्रास दिला जात नाही. तपास यंत्रणा केवळ त्यांचे काम करत आहेत,’ असे बापट म्हणाले.

शिवसेना-भाजपच्या युतीच्या मुद्द्यावर बापट यांनी आशावाद व्यक्त केला. ’हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप-शिवसेनेची युती होती. पुढेही होऊ शकते. कारण हिंदुत्व हा आमचा श्‍वास आहे. सरनाईक यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. ते सर्वांच्या मनातील बोलले आहेत. राजकीय जीवनात असे होत असते. भाजपने आधीही सांगितले होते, की शिवसेना-भाजप ही नैसर्गिक युती आहे. मधल्या काळात काही कृत्रिम लोकांनी ती तोडली. भूतकाळातील गोष्टींबद्दल अधिक बोलण्यात आता अर्थ नाही; पण भविष्यात अशी युती झाल्यास भाजपच्या कार्यकर्त्यांनाही आनंद होईल,’ असे त्यांनी सांगितले.

COMMENTS