Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्य सरकारकडून आरोग्य विभागासाठी बंपर भरतीची घोषणा

मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्रात कोरोना संकटानंतर सातत्याने वेगवेगळ्या विभागांसाठी सरकारी नोकरीच्या संधी जाहीर होत आहेत. आता आरोग्य विभागात तब्ब

शेतकर्‍यांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे – कृषीमंत्री मुंडे
पुण्याचा लौकिक आणि आजची स्थिती
शेवगाव शहरात सायकल फेरी काढून मतदान जागृती अभियान

मुंबई प्रतिनिधी – महाराष्ट्रात कोरोना संकटानंतर सातत्याने वेगवेगळ्या विभागांसाठी सरकारी नोकरीच्या संधी जाहीर होत आहेत. आता आरोग्य विभागात तब्बल 11000 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी गृह विभागाकडून पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती. नंतर वन विभागाकडून वन संरक्षक आणि मसहूल विभागाकडून तलाठी भरतीची घोषणा करण्यात आली होती. तलाठी भरतीच्या सध्या परीक्षा सुरू आहेत. राज्यात सध्या तलाठी पदाच्या 4644 जागांसाठी परीक्षा घेतली जात आहे. या भरतीसाठी 20 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. त्यानंतर आता आरोग्य विभागाकडून मोठ्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. स्वत: आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबतची घोषणा केली आहे. आरोग्य विभागात भरती राज्यात उद्यापासून आरोग्य विभागात भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आरोग्य विभागात 11000 हजार पदांसाठी भरती होणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारी नोकरीचा शोध घेणाऱ्या तरुणांना यासाठी आता चांगली संधी उपलब्ध होणार आहे. आरोग्य विभागात कमी मनुष्यबळ असल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत होता. त्यामुळे सातत्याने याबाबतच्या तक्रारी येत होत्या. सरकार आणि आरोग्य विभाग लवकरच यावर तोडगा काढेल, अशी चर्चा होती. अखेर आरोग्य विभागाने या प्रकरणी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आरोग्य विभागात आता बंपर भरती होणार आहे. तब्बल 11000 पदांसाठी भरती केली जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. आरोग्य विभागातील 11 हजार पदांसाठी उद्या आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. आरोग्य विभागात वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीत अधिकाऱ्यांची देखील निवड होणार आहे. तसेच कर्मचारी वर्गासाठी देखील ही भरती महत्त्वाची ठरणार आहे.

10 हजार 949 पदांची भरती -आरोग्य विभागात तब्बल 10 हजार 949 पदांची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. ही भरती गेल्या 3 वर्षांपासून रखडली होती. पण आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने भरती प्रकियेला सुरुवात झालीय. ‘क’ आणि ‘ड’ गटातील एकूण 10 हजार 949 पदांची होणार मेगाभरती होणार आहे.

COMMENTS