Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोदावरी कालव्याच्या पाण्यातून बंधारे भरून द्या ःकार्ले

राहाता/प्रतिनिधीः  गोदावरी कालव्यांना जलसंपदाने पाणी सोडुन उभ्या पिकांना पाणी द्यावे. तसेच परिसरातील बंधार्‍यामध्ये पाणी सोडावे, अशी मागणी गणेश क

परिमल निकम यांना कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी पुरस्कार
होळी, धुलीवंदन व रंगपंचमी साजरी करण्यावर निर्बंध ; कोरोनामुळे प्रशासनाचा निर्णय
नितीन गडकरी व शरद पवार येणार एकाच मंचावर.. ४ हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ

राहाता/प्रतिनिधीः  गोदावरी कालव्यांना जलसंपदाने पाणी सोडुन उभ्या पिकांना पाणी द्यावे. तसेच परिसरातील बंधार्‍यामध्ये पाणी सोडावे, अशी मागणी गणेश कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक अ‍ॅड. नारायणराव कार्ले पाटील यांनी केली आहे.
गोदावरी कालव्यांच्या या लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण नगण्य राहीले आहे. दोन महिन्यांपासुन पावसाने परिसराला हुलकावणी दिली आहे. त्यामुळे खरीपाची पिके पार उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी देखील अडचणीत सापडला आहे. या शेतकर्‍यांना आधार देण्याची आता गरज आहे. नाशिक जिल्ह्यात घाटमाथ्यावर धरणं भरतील इतपत पाउस झालेला आहे. या धरणांमधुन गोदावरी नदीतून पाणी विसर्गाच्या रुपात जायकवाडीला जात आहे. मात्र गोदावरी कालव्यातुन पाणी बंधारे, तळे भरण्यास दिले जात नाही. वास्तविक जायकवाडीत उपयुक्त पाणी साठा 26 टिएमसी हून अधिक आहे. त्यामुळे जायकवाडीला पिण्याच्या पाण्याची अडचण येणार नाही. मात्र नाशिकच्या धरणांचे ओव्हरफ्लोचे पाणी गोदावरीत सोडले जात आहे. मात्र कालव्यांना पाणी न सोडून दुजाभाव केला जात आहे. गोदावरी कालव्यांना पाणी सोडले. तर परिसरात पावसाअभावी तळाला गेलेल्या विहीरी, इंधन विहीरी यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल. शेतकर्‍यांना जनावरांच्या हिरव्या चार्‍याचा प्रश्‍न भेडसावणार नाही. सध्या शेतकर्‍यांची उभी पिके सुकून चालली आहेत. या पिकांनाही आधार होईल.
    संपूर्ण राहाता व कोपरगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण नगण्य आहे. ही दोन्ही तालुके दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत. जायकवाडीला पाणी सोडल्या गेले. तर ते पुन्हा विरुद्ध दिशेला आणता येत नाही. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेवून जलसंपदा विभागाने गोदावरी कालव्यांना सलग पाणी सोडावे. तरच या दोन्ही तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकरी जगतील. खरीप हंगाम जवळपास वाया गेलाच आहे. रब्बीच्या आशा धुसर  झाल्या आहेत. सह्याद्री घाटमाथ्यावर पावसाचे आगमन अधून मधून होत आहे. त्यातून गोदावरीला 1600 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या विसर्गातील पाणी गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना पूर्ण क्षमतेने सोडावे. त्यामुळे पावसाअभावी येणार्‍या अडचणी दूर होतील.

COMMENTS