Homeताज्या बातम्यादेश

कोटामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सुरूच

पाच तासांमध्ये दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

कोटा/वृत्तसंस्था ः राजस्थानातील कोट येथील कोचिंग इन्स्टिटयूट नीटच्या परीक्षांची तयारीसाठी संपूर्ण देशात ओळखले जात आहे. मात्र हेच कोटा सेंटर आता व

हिंगोलीत शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या
भाजप आमदार राहुल कुल यांना धक्का  
कॉलेजला निघालेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार

कोटा/वृत्तसंस्था ः राजस्थानातील कोट येथील कोचिंग इन्स्टिटयूट नीटच्या परीक्षांची तयारीसाठी संपूर्ण देशात ओळखले जात आहे. मात्र हेच कोटा सेंटर आता विद्यार्थ्यांच्या आत्महत्येसाठी देखील ओळखले जात आहे. कारण अभ्यासाच्या दडपणाखाली असलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करतांना दिसून येत आहे. गेल्या पाच तासांमध्ये दोन आत्महत्यांमुळे खळबळ उडाली आहे. यातील एक विद्यार्थी महाराष्ट्रातील लातूरचा असल्याचे समोर आले आहे.
अभ्यासाचे दडपण आणि चाचणी परीक्षेत मनासारखे गुण न मिळाल्यामुळे विद्यार्थी तणावात जातांना दिसून येत आहे. रविवारीही चाचणी मालिकेत कमी गुण मिळाल्याने दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्यात महाराष्ट्रातील लातूरच्या एका विद्यार्थ्याचाही समावेश होता. यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी कोचिंगमध्ये परीक्षा घेण्यास बंदी घातली आहे. सध्या ही बंदी दोन महिन्यांसाठी लागू करण्यात आली आहे.कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात विद्यार्थी छतावरून पडताना दिसत आहे. एकाने सहाव्या मजल्यावरून उडी मारली, तर दुसर्‍याने फाशी घेतल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात अधिक माहिती देतांना पोलिस अधिकारी भागवतसिंह हिंगड म्हणाले की, रविवारी दुपारी तीनच्या सुमारास लातूर येथील 16 वर्षीय आविष्कार संभाजी कासले याने कोचिंग इन्स्टिट्यूटच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. कोटा येथील तलवंडी भागात अविष्कार 3 वर्षांपासून राहत होता. तो इथे नीटची तयारी करत होता. रविवारी रस्ता क्रमांक एक येथील कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये परीक्षेसाठी आला होता. तर कुन्हडी येथील लँडमार्क परिसरात राहणारा विद्यार्थी आदर्श (18) हा सायंकाळी 7 वाजता खोलीत फाशी घेतलेल्या आढळून आला. आदर्श बिहारमधील रोहिताश्‍व जिल्ह्यातील रहिवासी होता. विद्यार्थी नीटच्या तयारीसाठी 4 महिने आधीच कोटा येथे आला होता.

येथील लँडमार्क परिसरात तो भाऊ आणि बहिणीसोबत फ्लॅटमध्ये राहत होता. पोलिस म्हणाले की, फ्लॅटमध्ये तीन स्वतंत्र खोल्या आहेत. रविवारी परीक्षा दिल्यानंतर आदर्श त्याच्या खोलीत गेला होता. सायंकाळी 7 वाजता बहिणीने त्याला जेवणासाठी बोलावले, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. यानंतर त्याने चुलत भावाला फोन केला. दोघांनी बराच वेळ दरवाजा ठोठावला, पण उत्तर मिळाले नाही. यानंतर दोन्ही भावंडांनी दरवाजा तोडला. आदर्श फासावर लटकलेला पाहून दुसर्‍या फ्लॅटमध्ये राहणार्‍या लोकांना त्यांनी माहिती दिली. यानंतर, त्याला खाली काढल्यानंतर त्याला रुग्णालयात नेले. तिथे त्याला वाचवण्यासाठी सीपीआर देण्यात आला, मात्र त्याला वाचवता आले नाही. पोलिसांनी सांगितले की-कोचिंग इन्स्टिट्यूटच्या टेस्टमध्ये आदर्शला सतत कमी मार्क येत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. 700 पैकी त्याला फक्त 250 गुण मिळवता आले. याची त्याला काळजी वाटत होती. यामुळे त्याने गळफास घेतल्याचे समजते. एएसपी म्हणाले – आतापर्यंत कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. पालक आल्यानंतर खोलीची झडती घेतली जाणार आहे. कोटाचे जिल्हाधिकारी ओपी बनकर यांनी 12 ऑगस्ट रोजी मार्गदर्शक तत्त्वे जारी करून कोचिंग ऑपरेटर्सना कडक सूचना दिल्या. रविवारी कोणत्याही चाचण्या घेऊ नये अशा सूचना देऊनही, दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची प्रकरणे रविवारीच समोर आली आहेत. या घटनेनंतर जिल्हाधिकारी ओपी बनकर यांनी रविवारी रात्री आदेश जारी केले. या आदेशांनुसार आता कोणतीही कोचिंग इन्स्टिट्यूट दोन महिने मुलांची टेस्ट घेणार नाही.

COMMENTS