Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर

-अध्यक्षपदी स्वप्नील मंजुळ तर कार्याध्यक्षपदी आकाश वाजे

कोपरगाव / ता.प्रतिनिधी ःसुयोग्य नियोजन, अनेक आकर्षक बक्षिसांची रेलचेल, नयनरम्य विद्युत रोषणाई, गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सुसंस्कृत

संगमनेरमध्ये बनावट गॅस रेग्युलेटर जप्त
मोकाटेवरील दाखल गुन्हा खोटा असल्याचा दावा ; पत्नीचे जिल्हा पोलिस प्रमुखांना निवेदन
अहमदनगर जिल्ह्यातील 3 लाख हेक्टरवरील पिके अडचणीत

कोपरगाव / ता.प्रतिनिधी ःसुयोग्य नियोजन, अनेक आकर्षक बक्षिसांची रेलचेल, नयनरम्य विद्युत रोषणाई, गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सुसंस्कृत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी उत्सव समितीची सन-2023 ची कार्यकारिणी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या एका बैठकीत एकमताने निवडण्यात आली. यावर्षीच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी स्वप्नील मंजुळ तर कार्याध्यक्षपदी आकाश वाजे यांची निवड करण्यात आली आहे.

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही येत्या 7 सप्टेंबर रोजी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर दहीहंडी उत्सव अत्यंत शिस्तबद्ध व शांततामय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या दहीहंडी उत्सवाच्या नियोजनासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांची बैठक माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीस अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, विनोद राक्षे, माजी नगरसेवक नयनकुमार (बबलू) वाणी, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, रवींद्र रोहमारे, अल्ताफभाई कुरेशी, खालिकभाई कुरेशी, शिवाजीराव खांडेकर, दीपक जपे, प्रसाद आढाव, इलियासभाई खाटिक, भागचंद रुईकर, विजय चव्हाणके, शुभम पेकले, चंद्रकांत वाघमारे, अर्जुन मोरे, सलीम पठाण, किरण सुपेकर, सचिन सावंत, शंकर बिर्‍हाडे, शेखर कुर्‍हे, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, स्वराज सूर्यवंशी, स्वराज लकारे, विक्रांत सोनवणे, सतीश निकम, किरण गायकवाड, भैय्या नागरे, विशाल गोर्डे, प्रमोद संवत्सरकर, संदीप ठोमसे, रवींद्र कळसकर, नवनाथ संवत्सरकर, नितीन कुर्‍हे, दुर्गेश गवळी, आदित्य डिंबर, नयन शिंदे, चंदू जाधव, गणेश कळसे, युवराज शिरसाठ, रोहन दरपेल, अनिल गायकवाड, समीर सुपेकर, शाम शिंदे, आकाश खैरे, सौरभ होन, विक्की परदेशी, मंगेश धनगे, अजय शार्दुल, पियुष चिने, समर्थ घुमरे आदींसह भाजप, भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत श्री छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी उत्सव समिती-2023 च्या कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी स्वप्नील मंजुळ तर कार्याध्यक्षपदी आकाश वाजे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी नूतन पदाधिकार्‍यांचा यावेळी शाल देऊन व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

कोपरगाव तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री सहकारमहर्षी स्व.शंकरराव कोल्हे यांचा आदर्श जोपासत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे हे सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन समाजकार्य करत आहेत. विवेक कोल्हे यांनी स्थापन केलेल्या व ‘जागवू या ज्योत माणुसकीची’ हे ब्रीदवाक्य असलेल्या संजीवनी युवा प्रतिष्ठानमार्फत गेल्या आठ वर्षांपासून संकटकाळात जनतेला मदत करण्याबरोबरच विविध उपक्रमांच्या माध्यमातून राजकारणविरहीत सामाजिक कार्य अव्याहतपणे सुरू आहे. जनतेचे खास आकर्षण असलेला संजीवनी युवा प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव हा सुसंस्कृत म्हणून ओळखला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने हा सोहळा भव्य-दिव्य स्वरुपात, जल्लोषात व खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करण्यात येणार असून, गोविंदा पथकांसाठी अनेक आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

COMMENTS