Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘टोलच्या नावाखाली लोकांची लूट…’ मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे टोलवर कवी सौमित्रची पोस्ट चर्चेत

मुंबई प्रतिनिधी - लोकप्रिय अभिनेते आणि कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली आहे. नुकतंच किशोर क

जिल्ह्यात चार महिन्यात 129 अपघातात 139 जणांचा मृत्यू
समाजवादी पक्षाचा गड कोसळला; मुलायमसिंह यादव यांचे निधन
महसूलमंत्री ना. थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचा सहकार पॅटर्न दिशादर्शक – नामदार कदम

मुंबई प्रतिनिधी – लोकप्रिय अभिनेते आणि कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली आहे. नुकतंच किशोर कदम यांनी फेसबुकवर मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टच्या माध्यमातून कवी सौमित्र यांनी सरकारला काही सवाल विचारले आहेत. या हायवेवर आकारल्या जाणाऱ्या टोलसंदर्भात त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत. सौमित्र यांनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील स्वत:ची मतं मांडली आहेत

अभिनेते आणि कवी किशोर कदम आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “मुंबईहून पुण्याला जातांना एक्स्प्रेस हायवे वर २४० टोल घेतात. मध्ये मनःशांती वगैर मध्ये काही खायला लोणावळ्यात उतरलं की वर हायवेवर पुन्हा आल्यावर पुन्हा २४० का घेतात? टोलच्या नावाखाली चाललेली लोकांची ही लूट थांबवण्याबद्दल कुणी बोललं का? आणि एरवीही प्रवास केल्यावर अधून मधून फास्टटॅग मधून पैसे गेल्याचे मेसेजेस तासा दोनतासांनी येत राहतात. ते पैसे कुठे आणि का जातात? अरे लूट थांबवा रे ही. लोक काहीच बोलत नाहीत म्हणून किती लुटणार आहात?कुणाकडे तक्रार करायची? याला जबाबदार अधिकारी कोण आहेत?” सध्या सौमित्र यांचीही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी किशोर यांच्या या पोस्टवर पाठिंबा देत त्यांनाही असाच अनुभव आल्याचे सांगितले आहे.

COMMENTS