बीड प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार वाहतुक मुकादम युनियन व शिवशाहु ऊसतोड कामगार संघटनेकडून ऊसतोडणी कामगारांच्या विविध मागण्यासंदर्भात
बीड प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार वाहतुक मुकादम युनियन व शिवशाहु ऊसतोड कामगार संघटनेकडून ऊसतोडणी कामगारांच्या विविध मागण्यासंदर्भात आज दि.25 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे एक उपोषण करण्यात आले यावेळी पांडूरंग आंधळे (राज्यसंघटक तथा बीड जिल्हाध्यक्ष), बाळासाहेब मोरे (राज्य अध्यक्ष शिवशाहु ऊसतोड कामगार संघटना), डॉ.संजय तांदळे (राज्य उपाध्यक्ष) यांनी ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्ना संदर्भात मा.जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत, मुख्यमंत्री, पालकमंत्री, सहकार मंत्री, कामगार मंत्री, सहकाय आयुक्त, कामगार आयुक्त, विरोधी पक्षनेते आणि साखर आयुक्त कार्यालय पुणे यांना लेखी निवेदन दिले देवून उपोषण केले व प्रश्न सोडवण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे पुढील मागण्या करण्यात आल्या, ऊसतोड कामगारांना कामाचा ऊस तोडणी भरणी दर रुपये 500 रुपये प्रति टन मिळावा. तसेच ऊसतोडणी कामगारांच्या कामाचे घामाचे पैसे त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करावेत, हमाल, माथाडी कामगारांप्रमाणे ऊस तोडणी मजुरांना कामगारांचा दर्जा देण्यात यावा.,लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ कार्यान्वित करण्यात यावे व मंडळावर अध्यक्षाची नियुक्ती त्वरीत करण्यात यावी. ऊस तोडणी कामाची दरवाढ महागाई निर्देशांकानुसार दरवर्षी ठरवण्यात यावी., स्थलांतरीत ऊसतोडणी कामगार व स्थानिक ऊसतोडणी कामगार यांची नोंदणी साखर कारखान्यावर करुन ओळखपत्रे देण्यात यावीत इत्यादी मागण्या उपोषणादरम्यान केल्या गेल्या आहेत.
COMMENTS