कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आणि गेल्या वर्षीप्रमाणेच दुधाच्या व्यवसायावर संकट आले आहे .
कोपरगांव प्रतिनिधी – कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आणि गेल्या वर्षीप्रमाणेच दुधाच्या व्यवसायावर संकट आले आहे . अशातच खासगी व सहकारी दुध संघाने लॉकडाऊनचे कारण देत दुधाचे दर रुपये . १० / – ते १५ / – प्रतिलिटरने पाडले असुन ग्राहकांसाठीचे विक्रीदर मात्र तसेच ठेवत दुध उत्पादक व ग्राहकांची प्रंचड लूट केली जात आहे , याबाबत अनेक ठिकाणी निदर्शने करत तहसिलदार यांना निवदेन देण्यात आलेली आहे . सध्याचे परिस्थितीत दुध उत्पादक हा फार मोठया अडचणीत सापडलेला आहे एकीकडे हिरव्या चा – याचे भाव , सरकी पेंडीचे भाव गगनाला भिडलेले आहेत तर दुसरीकडे एक लिटर दुधाला सरासरी रुपये..१८ ते २० प्रतिलिटर दर मिळत आहे . एका गाईला रोजचे रोज साधारणत : रुपये . १५० ते २०० चा चारा व पेंडीचा खर्च होतो सदरचा खर्च पहाता त्यासाठी लागणारी मेहनत फुकट जाते . खासगी व सहकारी दुध संघ दुध उत्पादकांकडुन रुपये . २० / – ने दुध खरेदी करुन ते रुपये . ४५ / – ने ग्राहकांना विक्री करत आहे . दुधाचे मिळणाऱ्या पैशातून पशुखाद्याची बरोबरी सुध्दा होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झालेली असुन शेतीचा दुध जोडधंदा तोटयात आला आहे . याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोपरगाव बाजार समितीचे सभेत शासनाने दुध दरात वाढ करणेबाबत ठराव केलेला आहे . तरी कोरोनाच्या नावाखाली दुध उत्पादक शेतकऱ्यांची होणारी लुट सरकारने थांबवावी व दुध उत्पादकांना न्याय देऊन दुध दरात वाढ करावी.अशी मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात कोपरगाव बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे यांनी केली आहे.
COMMENTS