Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाजार समितीचे सभापती संजय जाधव यांचा वाढदिवस युवक कॉंग्रेस तर्फे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

चांदवड प्रतिनिधी -  बाजार समितीचे सभापती संजय दगुजी जाधव यांचा यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमे करत साजरा करण्यात आला. याकरीता चांदवड विधानसभा

गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कठोर शासन करा
रेल्वेस्थानकात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला
अ‍ॅड. रावसाहेब अनर्थे यांची गिनीज बुकात नोंद

चांदवड प्रतिनिधी –  बाजार समितीचे सभापती संजय दगुजी जाधव यांचा यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमे करत साजरा करण्यात आला. याकरीता चांदवड विधानसभा युवक कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष श्री. दिपांशु जाधव यांनी त्यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यात सकाळी 8.00 वा. इच्छापुर्ती गणपती मंदिर,चांदवड येथे श्री. जाधव यांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर देवीहट्टी, धोंडगव्हाण, वडगांवपंगु व चांदवड येथील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच सरकारी दवाखान्यात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. जोपुळ, चांदवड, आहेरखेडे, भोयेगाव, शिरुर, वडगांव पंगु, विटावे, शिंदे, डोणगाव, चिखलआंबे, दुधखेड, पारेगाव, धोडांबे, कुंडाणे येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर भोयेगाव येथे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस व युवक कॉंग्रेस कमिटी नविन शाखा सुरु करण्यात आली. 

श्री. जाधव यांच्या वाढदिवसानिमीत्त त्यांना मा.आ.श्री.शिरिषकुमार कोतवाल, डॉ.सयाजीराव गायकवाड, नितीन आहेर, डॉ.आत्माराम कुंभार्डे, कारभारी आहेर, भिमराव जेजुरे, समाधान जामदार, अरुण पगार, भाऊसाहेब ठाकरे, संपतराव वक्टे, सुरज चिंचोले, जयेश पोकळे, स्वप्निल पाटील यांसह बाजार समितीचे संचालक, अधिकारी, कर्मचारी, कांदा-भाजीपाला-भुसार व्यापारी, मापारी, हमाल यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात. तसेच राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील थोरा-मोठ्यांनी शुभेच्छा त्यांना दिल्यात. 

यावर्षीचा वाढदिवस हा अविस्मरणीय असुन चांदवड-देवळा मतदार संघावर असलेले दुष्काळाचे सावट दुर होवून चांगल्या प्रमाणात पाऊस पडावा, तसेच शेतकरी राजाच्या शेतीमालास योग्य बाजारभाव मिळुन त्यांच्या कष्टाचे चीज व्हावे व त्यांच्यावर कोणतीही आस्मानी व सुलतानी संकटे येऊ नये, अशी प्रार्थना श्री. जाधव यांनी इच्छापुर्ती गणेश मंदिरात व्यक्त केली. तसेच त्यांना समक्ष, व्हॉटसअप, फेसबुक व इतर माध्यमातुन दिलेल्या शुभेच्छांचा त्यांनी स्विकार केला व त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. 

तसेच सदर सामाजिक उपक्रमे पार पाडण्याकरीता, दिपांशु जाधव, अरुण पगार, गोकुळ जाधव, यशराज मोरे, संगम भामरे, अक्षय माकुने, अमित जाधव, स्वप्निल जाधव, गोपी कोतवाल, अरुण पगार, बाळासाहेब शिंदे, मंगेश दरेकर, सागर निकम, मयुर ठोंबरे, दर्शन जाधव, रोहीत खांगळ, किरण ठाकरे, धनंजय जाधव व इतर चांदवड विधानसभा युवक कॉंग्रेस कमिटीचे सदस्यांनी मेहनत घेतली.

COMMENTS