Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 सर्वोदय विदया मंदिर येथे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष-2023 साजरे

अकोले/प्रतिनिधी ः महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत येणार्‍या शबरी आदिवासी व विकास महामंडळ मर्यादित नाशिक यांच्या आर्थिक सहक

शिक्षक बँकेच्या निवडणुकीने दिले सव्वा लाखाचे उत्पन्न ; साडेआठशेवर उमेदवारी अर्ज दाखल
सहकारी पतसंस्था फेडरेशनला सर्वतोपरी सहकार्य ः बिपीनदादा कोल्हे
शिवसेना पदाधिकार्‍याच्या भावास ठार मारण्याची धमकी

अकोले/प्रतिनिधी ः महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत येणार्‍या शबरी आदिवासी व विकास महामंडळ मर्यादित नाशिक यांच्या आर्थिक सहकार्याने व बायफ संस्था नाशिक, यांच्या तांत्रिक मदतीने अकोले तालुक्यातील 13 गावांमध्ये शेतकर्‍यांसोबत बायफ सिड बँक प्रकल्प सुरू आहे. सदरील प्रकल्पाच्या माध्यमातून अकोले तालुका  येथे सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय खिरविरेत आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष-2023 उत्साहात साजरे करण्यात आले.  
येथील शालेय विद्यार्थ्यांसाठी आपल्या भागातील भरडधान्य आणि रानभाज्या विविधता बाबत जनजागृती पर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती.या कार्यशाळेला संबोधित करताना फूडमदर ममताबाई भांगरे यांनी आहारामधील भरडधान्यांची विविधता,पोषणमूल्यचे महत्त्व विशद केले. निसर्गतः उपलब्ध असणार्‍या विविध रानभाज्यांचे, वाल घेवडा, भात, नाचणी, वरई यांसारख्या पारंपारिक पिकांचे प्रदर्शन यावेळी सादर करण्यात आले होते. यावेळी स्थानिक जैविविधता,वन्यजीव संवर्धन आणि हवामान बदल या विषयी विवेक दातीर (संचालक,ठधऊएड) यांनी सखोल मार्गदर्शन केले. शालेय विध्यार्थ्यांना आपल्या भागातील स्थानिक कृषी जैवविविधता,आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष आणि बायफ सेवाभावी संस्थेचे कार्य याबाबत सखोल असे मार्गदर्शन बियाणे बँक प्रकल्प समन्वयक योगेश नवले यांनी केले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य मधुकर मोखरे,विक्रम आंबरे,रामदास डगळे, प्रविण मालुंजकर, व्हि.बि. पांडे,भास्कर सदगिर ,धनंजय लहामगे,भाऊसाहेब कोते ,संगिता भांगरे, वनिता बेंडकोळी, एस.एन.वाकचौरे ,सौरभ मोहटे,योगेश बागड उपस्थित होते. सेवाभावी संस्थेचे आनंदा घोलवड,राम भांगरे,राहुल डफाळ,शुभम पवार यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

COMMENTS