Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 कर्जतमध्ये श्री संत गोदड महाराज जन्मोत्सव उत्साहात

लाखो भाविकांसाठी केलेे महाप्रसादाचे वाटप

कर्जत/ प्रतिनिधी ः कर्जत येथील ग्रामदैवत श्री संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने पाटील गल्ली येथील ध्यान मंदिर येथे विविध ध

प्रणाली आहेरने मिळवला तृतीय क्रमांक
शाळेला गावाचा आधार आणि गावाला शाळेचा अभिमान वाटला पाहिजे ः अरुण भांगरे
पाथर्डी तालुक्यातील येळीमध्ये भरदिवसा दरोडा

कर्जत/ प्रतिनिधी ः कर्जत येथील ग्रामदैवत श्री संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने पाटील गल्ली येथील ध्यान मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त घरोघरी सडा, रांगोळी, तोरण व गुढी उभारून महाराजांच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. यावेळी ह.भ.प.दयानंद महाराज कोरेगावकर यांचे हरिकीर्तन झाले.किर्तनानंतर महाआरती करण्यात आली.
कर्जत तालुका तालीम संघाचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य पै.प्रवीण घुले पाटील यांनी गोदड महाराजांचा जीवनपट उलगडून दाखवला. त्यानंतर राबविण्यात येणार्‍या उपक्रमांची माहिती दिली. श्री संत गोदड महाराज जन्मोत्सवाला आलेल्या सर्वांचे स्वागत करून आभार मानले.या जन्मोत्सवानिमित्त  राज्यभरातून लाखो भक्तांची मंदीयाळी लोटली होती. या लाखों भाविकांसाठी तब्बल 50 ते 60 हजार लिटर शिपी आमटी बनवण्यात आली होती. या शिंपी आमटीच्या महाप्रसादाचा लाखो भाविकांनी लाभ घेतला.
ग्रामदैवत श्री संत गोदड महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त भाविकांना शिपी आमटीचा महाप्रसाद देण्यात येतो. पै.प्रवीण घुले पाटील मित्र मंडळ, जन्मोत्सव समिती, मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ यामध्ये सक्रिय सहभाग घेतात. गेल्या बारा वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. शंभर भाविकांच्या प्रसादापासून ही परंपरा सुरू झाली होती. ती आता लाखो भाविकांच्या महाप्रसादापर्यंत पोहोचली आहे. तब्बल पन्नास ते साठ हजार लिटर शिपी आमटी, सुमारे 100 पोते गव्हाच्या चपात्या या महाप्रसादासाठी करण्यात आल्या होत्या. अशा भव्य महाप्रसादाचे आयोजन करत कर्जत येथे श्री संत सद्गुरू गोदड महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा झाला.

COMMENTS