Homeताज्या बातम्यादेश

पश्‍चिम रेल्वे मार्गावरील 48 रेल्वे रद्द

इंटरलॉकिंगच्या कामासाठी 56 तासांचा जम्बो ब्लॉक

नवी दिल्ली/प्रतिनिधी : पश्‍चिम रेल्वेने सुरत यार्डात इंटीलॉकिंगच्या कामांसाठी तब्बल 56 तासांचा जम्बो ब्लॉक घेतल्यामुळे तब्बल 48 रेल्वे रद्द करण्य

अशोक कोळेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश
शेतकऱ्यांना जुन्या दराने खताची विक्री करावी : कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन
शॉर्टसर्किटने ओमनी कार जळून खाक

नवी दिल्ली/प्रतिनिधी : पश्‍चिम रेल्वेने सुरत यार्डात इंटीलॉकिंगच्या कामांसाठी तब्बल 56 तासांचा जम्बो ब्लॉक घेतल्यामुळे तब्बल 48 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. शनिवार 26 पासून ते 28 ऑगस्टच्या सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. एकूण 56 तासांचा हा ब्लॉक आहे.
या ब्लॉकच्या कालावधीत सूरत आणि उधनादरम्यान तिसरी मार्गिका जोडण्याचे काम करण्यात येईल. या ब्लॉकमुळे अनेक लांबपल्ल्याच्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक ट्रेन अंशतः रद्द, तर काही अन्य मार्गाने वळवण्यात येणार आहेत. तिसरी मार्गिका सुरू झाल्याने सूरत-उधना दरम्यान दिल्ली-मुंबईच्या दोन्ही अप आणि डाउन मेन लाइनवरील एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक सुरुळीत होईल. जवळपास 40 एक्स्प्रेस पॅसेंजर ट्रेन सूरत-उधना दरम्यानच्या तिसर्‍या मार्गिकेवर वळवण्यात येतील, असे सांगितले जाते. या मार्गिकेमुळं ट्रेन वेळेत धावतील, याशिवाय ट्रेनची संख्या देखील वाढणार आहे. पश्‍चिम रेल्वेने 26 ते 28 ऑगस्ट या 56 तासांच्या ब्लॉकच्या कालावधीत 48 लांबपल्ल्याच्या ट्रेन रद्द केल्या आहेत. तर 26 ट्रेन अंशतः रद्द किंवा शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत. 2 ट्रेन अन्य मार्गावरून वळवल्या आहेत. ब्लॉकच्या कालावधीत सर्वाधिक राजस्थानला जाणार्‍या ट्रेन रद्द होणार आहेत. दादर-अजमेर, दादर-बिकानेर, दादर-भूज, वांद्रे-जयपूर, मुंबई-इंदूर, मुंबई-दिल्ली या ट्रेन रद्द करण्यात येतील.

COMMENTS