भंडारा प्रतिनिधी - भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात येरली येथे एका आदिवासी आश्रम शाळेत 37 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादाय
भंडारा प्रतिनिधी – भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात येरली येथे एका आदिवासी आश्रम शाळेत 37 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विद्यार्थ्यांनी जेवणात वरण ,भात, बटाटा, वाटाणा चपाती घेतली होती. जेवल्यानंतर काही वेळाने विद्यार्थ्यांचा पोटात दुखू लागले त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या37 विद्यार्थ्यांपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यात तुमसर तालूक्यात येरलीच्या आदीवासी आश्रम शाळेत इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण देण्यात येत असून ही आदिवासी आश्रम शाळा गोंदिया एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून चालवली जाते. या आश्रमशाळेत 325 विद्यार्थी शिकतात.
दररोज प्रमाणे दुपारी विद्यार्थ्यांना जेवण दिले त्यात बटाटा, वाटाणा, चपाती, वरण, भात दिले. विद्यार्थ्यांनी जेवण केल्यावर काहीच वेळात त्यांच्या पोटात दुखायला लागले तर काहींना चक्कर आली. मुलांनी त्याची तक्रार शिक्षकांकडे केली असता त्यांनी दुर्लक्ष केले. संध्याकाळी विद्यार्थ्यांना जास्त त्रास होऊ लागला आणि काहींना उलट्यांचा त्रास सुरु झाला. त्यांना तातडीनं तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांच्यावर उपचार सुरु केले मात्र त्यापैकी चार विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तर इतर 33 विद्यार्थी धोक्याबाहेर आहे. या घटनेची माहिती मिळतातच जिल्हा परिषद शिक्षण सभापती रमेश पारधी यांनी रुग्णालयात धाव घेत विद्यार्थ्यांच्या तब्बेतीची चौकशी केली.
COMMENTS