बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक मिका सिंगच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर येत आहे. गायक गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. प्रकृती अ

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक मिका सिंगच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर येत आहे. गायक गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे परदेशात अडकला असून त्याने स्वतः ही माहिती दिली आहे. मिका सिंगने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘माझ्या 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत हे पहिल्यांदाच घडले आहे. माझी तब्येत बरी नसल्याने मला माझे शो पुढे ढकलावे लागले. जेव्हा माझ्या आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा मी नेहमीच काळजी घेतली आहे. पण मी अमेरिकेत बॅक टू बॅक शो केले. अजिबात आराम केला नाही. त्याचा परिणाम असा झाला की माझी तब्येत बिघडू लागली. गायकाच्या घशात इन्फेक्शन झाल्यामुळे तो परफॉर्म करू शकत नाही. अशा स्थितीत त्याचे 15 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत मिका सिंगने सांगितले की, त्याचे 10-15 कोटींचे नुकसान झाले आहे. शोमध्ये परफॉर्म न केल्यामुळे त्याला अनेकांचे पैसेही परत करावे लागले आहेत.
COMMENTS