देवळाली प्रवरा/प्रतिनिधीः लाल निशाण पक्ष व अहमदनगर जिल्हा शेतमजूर युनियनच्या वतीने जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी सन्मान मेळावा कॉ.भ
देवळाली प्रवरा/प्रतिनिधीः लाल निशाण पक्ष व अहमदनगर जिल्हा शेतमजूर युनियनच्या वतीने जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी सन्मान मेळावा कॉ.भि.र.बावके सभागृह मार्शल नगर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. मेळाव्यास प्रमुख वक्ते धुळे येथिल लाल निशाण पक्षाचे अध्यक्ष आदिवासी नेते कॉ.सुभाष काकुस्ते हे उपस्थित होते. तर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचे अध्यक्ष कॉ.बाळासाहेब सुरूडे होते. कॉ.राजेंद्र बावके,कॉ.जीवन सुरूडे,कॉ.शरद संसारे, कॉ.मदिना शेख, कॉ.राजेंद्र मुसमाडे,कॉ.उत्तम माळी,कॉ.आसरू बर्डे,कॉ.रंगनाथ दुशिग, कॉ.प्रकाश भांड आदींची प्रमुख उपस्थिती होती.वीर एकलव्य यांच्या प्रतिमेची बाजारतळापासून शहरातील मुख्य पेठातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीतील मोटारसायकल रॅलीमध्ये गर्जा महाराष्ट्र माझा या गीतावर एका तरुणांने तिरंगा ध्वज व इतरांनी लाल झेंडे हातात धरलेले होते. रॅलीने संपूर्ण शहरात लाल वादळ निर्माण झाले होते.
मेळाव्याच्या सुरुवातीला सर्वांनी उभे राहून भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे गीत गायले.त्यानंतर उपस्थितांनी वीर एकलव्य,बिरसा मुंडा,राघोजी भांगरे, तंटया मामा भिल्ल, उमाजी नाईक, ख्वाजा नाईक, राणी दुर्गावती, वीरांगना झलकारी छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमात रायभान ठाकर,बन्सी पवार,भानुदास जाधव,वच्छला बर्डे, आसाराम माळी, निवृत्ती गायकवाड आदिवासी कार्यकर्तेंचा सन्मान करण्यात आला.मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते लाल निशाण पक्षाचे अध्यक्ष कॉ.सुभाष काकूस्ते यांनी आदिवासी क्रांतिकारकाच्या ऐतिहासिक व संघर्षशील इतिहासाची मांडणी करून विकासाच्या नावाखाली केंद्र व राज्य सरकार नवनवीन कायदे करून मूळ आदिवासी यांना जल,जमिन,जंगल यापासून बेदखल करून कार्पोरेट कंपन्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहे.याविरोधात देशभर आदिवासी समाज हा मोठ्या जिद्दीने लढा देत असल्याचे त्यांनी सांगितले. मनुवाद पोसणार्या केंद्र सरकारने मणिपूर मधील माहिलांची नग्न धिंड काढणार्या प्रवृत्ती विरुद्ध कडक कारवाई करुन मणिपूर सरकार बरखास्त केले पाहिजे होते. परंतु देशाच्या पंतप्रधानांना तीन महिन्यांत मणिपूर येथे जाण्यासाठी वेळ मिळाला नाही. मणिपूरमध्ये दंगली चालू असताना संसदेत चकार शब्द न बोलणार्या पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट करावी. यासाठी विरोधकांनी अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव मांडला. त्यावरही बोलताना आपली भूमिका स्पष्ट न करता मागील बाबींवर ऊहापोह केला. हे आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, कष्टकरी जनताविरोधी धोरण घेणार्या प्रवृत्तीचे आदिवासीसह सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने प्रयत्न करून सत्तेतून उलथवून टाकण्याचे आवाहन यावेळी कॉ.काकूस्ते यांनी केले.
कार्यक्रमात कॉ.बाळासाहेब सुरूडे,कॉ.राजेंद्र बावके,कॉ.शरद संसारे,कॉ.मदिना शेख,कॉ जीवन सुरूडे यांची भाषणे झाली. आभार प्रदर्शन कॉ.श्रीकृष्ण बडाख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर जाधव,मिठूभाई शेख,नितीन दरंदले,सुरेश माळी,जालिंदर माळी,रविंद्र गटकळ, रामेश्वर जाधव,अनिल बोरसे,किरण मते,सुनील ठाकर,प्रकाश पवार,रविंद्र मोरे,भिका गोलवड,गोरख जाधव,देविदास जाधव,बबन माळी, बाबुलाल पठाण,भिमराज पठारे,रमेश डुक्रे,इंद्रनिल माळी,सलीम पठाण,सुशिला बर्डे, धोंडिराम कोकाटे,जालिंदर दुशिंग, विलास बर्डे, वैभव जाधव, किरण माळी, दादा राजगुरू, तुषार बर्डे, भैय्या दरंदले आदींनी परिश्रम घेतले.
COMMENTS