देवळाली प्रवरा/प्रतिनिधीः राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात दि.23 ऑगस्टला पहाटेच्या दरम्यान एका 65 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकांने आपल्या राहत्या
देवळाली प्रवरा/प्रतिनिधीः राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात दि.23 ऑगस्टला पहाटेच्या दरम्यान एका 65 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकांने आपल्या राहत्या घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. सोन्याबापू बाबुराव बरबडे असे या आत्महत्या केलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांचे नाव असून, त्यांच्या खिशात सुसाईट नोट देखील सापडली. चौकशीनंतरच आत्महत्याचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहीती पोलिसांनी दिली. दरम्यान घटनास्थळी मात्र वेगवेगळ्या चर्चेला उधाणआले होते.
याबाबत सूत्राकडून अधिकची समजलेली माहीती अशी की, मानोरी परीसरातील ठुबे वस्तीवरील निवृत्त शिक्षक सोन्याबांपू बरबडे यांचा पहाटेच्या दरम्यान रहत्या घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.या घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.पोपट कटारे, सपो.म्हातारबा जाधव, पो.कॉ.रोहित पालवे, सचिन बर्डे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मृतदेहाच्या खिशात तब्बल सहा चिठ्ठा सापडल्यात. घटनास्थळाच्या चर्चेवरून समजलेली माहीती अशी की, निवृत्त शिक्षक सोन्यांबांपू बरबडे यांचा एकुलता एक मुलगा शिवाजी बरबडे हा नोकरीनिमित्त पुणे येथे रहात होता. त्याच्या विवाहानंतर त्याची पत्नी-अन् तो तिकडेच रहात असताना सुनेचे दुसर्या एका व्यक्तीशी ओळख होऊन प्रेमसंबंध जुळले. त्यातूनच त्यांचे अनैतिक संबध प्रस्थापित झाले. सदर घटनेने घरात कायम वाव-विवाद सुरू असताना एका दिवशी त्यांच्या सुनेने आपल्या दोन मुली घेऊन पतीला सोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिण्यासह रोख रक्कम घेऊन ती प्रियकरासमावेत परगंदा झाली होती. तेव्हापासून ती आजपर्यंत ती तिच्या प्रियकरासमावेत रहात असल्याने बरबडे यांनी घटस्फोटासाठी न्यायालयीन खटला देखील दाखल केला होता. माञ आजपर्यंत घटस्फोट न होऊन त्या सुनेने वारंवार बरबडे कुटुंबीयांना मानसिक आणि आर्थिक ञास देत असल्याने बरबडे कुटुंबिय असहाय्य झाले होते. दरम्यान मुलाला पुण्यात नोकरी असल्याने तो व त्यांची आई तिकडेच रहात होती.सोन्यांबांपू बरबडे हे मानोरीत आपल्याला रहत्या घरी एक वर्षांपासून घरी एकटेच रहात होते. सदर प्रकरणाने अनेक दिवसापासून ते मानसिक तणाव देखील होते आज पहाटेच त्यांनी अंघोळ करून देवपुजा केली व नंतर घरासमोरीलच असलेल्या एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे सदर घटनेशी या आत्महत्याचा काही संबध आहे का.? हे पोलिस तपासानंतरच समोर येणार आहे.
COMMENTS