Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वृक्षतोड रोखण्यासाठी चार पथके तैनात

फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा

पुणे/प्रतिनिधी : विनापरवाना वृक्षतोडीच्या घटना वारंवार घडत असल्याने या प्रकाराला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून चार पथके नेमण्यात ये

संदीप वराळ खून प्रकरण लवकर निकाली काढा
दुबार पेरणीचे संकट
आ. तांबे यांची स्टेअर्स महाराष्ट्र गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड

पुणे/प्रतिनिधी : विनापरवाना वृक्षतोडीच्या घटना वारंवार घडत असल्याने या प्रकाराला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून चार पथके नेमण्यात येणार आहेत. त्यामुळे वृक्षतोडीला चाप बसणार आहे. भोसरी एमआयडीसीतील एका खासगी कंपनीतील आठ झाडे तोडण्यात आल्यानंतर, संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनसमोरील पदपथावरील वृक्षांच्या फांद्या तोडण्याची परवानगी घेण्यात आली होती. मात्र, त्याऐवजी वृक्ष तोडण्यात आल्याचे समोर आले होते. बांधकाम, जाहिरात फलकांसाठी शहराच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. खासगी जागेसह महापालिकेची झाडेही विनापरवाना तोडली जात आहेत. वृक्षतोडीच्या घटना रोखण्यासाठी उद्यान विभागाची चार स्वतंत्र पथके तयार करण्यात येणार आहेत. ही पथके आपापल्या भागाची पाहणी करणार आहेत. वृक्षतोडीतचे प्रकार आढळल्यास त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सारथी हेल्पलाइनप्रमाणे स्वतंत्र क्रमांक जाहीर करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले.

COMMENTS