Homeताज्या बातम्यादेश

चालत्या गाडीवर पडली वीज

रस्त्यावर होणाऱ्या अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कधी कसा कुठे अपघात होईल याचा कोणीही अंदाज बांधू शकत नाही. त्यामुळे रस्त्

रविकांत तुपकर यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी काँग्रेसची निदर्शने 
सुमार दर्जाचा ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या लायकीचा कसा ?
आमचे कर, भाडे व कामगारांचे पगार कोण देणार? ; व्यापारी-कामगारांचा महाविकास आघाडीला सवाल

रस्त्यावर होणाऱ्या अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कधी कसा कुठे अपघात होईल याचा कोणीही अंदाज बांधू शकत नाही. त्यामुळे रस्त्यावरुन चालताना, गाडी चालवताना सतर्कता बाळगण्यास सांगितलं जातं. अनेकदा निष्काळजीपणामुळे अपघात घडतात तर कधी चुकी नसतानाही काहींसोबत दुर्घटना घडतात. एकपेक्षा एक भीषण अपघात त्यांचे व्हिडीओ समोर येत असतात. असाच एक अपघाताचा व्हिडीओ समोर आलाय जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. अचानक अपघात घडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. चालू कारवर अचानकपणे वीज कोसळते. हे दृश्य भयानक असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर रहदारी सुरु आहे. अचानक एका कारवर वीज कोसळते आणि कारचं नियंत्रण सुटतं. कारमधून धूरही निघतो आणि थोड्याच अंतरावर जाऊन कार थांबते. त्यानंतर रस्त्यावरील लोक कार चालकाला वाचवण्यासाठी धाव घेतात. हे अपघाती दृश्य थरारक असून कोणी विचारही केला नसेल. अचानकपणे अशा धक्कादायक घटना घडत असतात. @OTerrifying नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ एकदम स्पष्ट दिसत नसला तरी व्हिडीओमध्ये नेमकं काय घडलं याविषयी समजत आहे. 37 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खळबळ माजवत आहे.दरम्यान, असे अचानकपणे अनेक अपघात घडतात. अशा घटनांमध्ये अनेकवेळा लोकांचा जीव जातो तर कधी काही लोक गंभीर जखमी होतात. नशीब बलवत्तर असेल तर लोक अपघातातून सुखरुपणे बाहेर पडतात. अशा अपघाताच्या घटना त्यांचे व्हिडीओ समोर येत असतात. यापूर्वीही असे अपघात घडत असतात.

COMMENTS