Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेस 70 लाखांचा नफा

अंबाजोगाई प्रतिनिधी - बिना सहकार नही उद्धार या तत्वावर गेली 34वर्षांपूर्वी सुरू केलेल्या श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेस मार्च 2023 अखेर 7

मुख्यमंत्री शिंदेंकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा वारसा ः औताडे
आता परदेशातही होणार लोच्या ; यु.एस., यु.ए.ई.सह अनेक देशांमध्ये ‘लोच्या झाला रे’ होणार प्रदर्शित
औषधांवर पुढील वर्षापासून बारकोड अनिवार्य होणार

अंबाजोगाई प्रतिनिधी – बिना सहकार नही उद्धार या तत्वावर गेली 34वर्षांपूर्वी सुरू केलेल्या श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेस मार्च 2023 अखेर 70 लाखांचा निव्वळ नफा मिळाल्याचे पतसंस्थेचे अध्यक्ष माणिक वडवणकर यांनी पतसंस्थेची 34 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले . त्याचबरोबर पतसंस्थेच्या सर्व सभासदांसाठी 8% लाभांश देणार असल्याचे जाहीर केले .
सर्वांना आपलं मानणारी आपली व सहकाराचे तत्व जनहिताला महत्व या उक्तीप्रमाणे श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेने मार्च 2023 अखेर 39 कोटीचा व्यवसाय (ठेवी) जमा करत श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेस मार्च 2023 अखेर 70 लाख रुपयांचा  नफा झाला असल्याची माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष माणिक वडवणकर यांनी दिली . ते पतसंस्थेच्या 34 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते . यावेळी संस्थेचे संस्थापक  राजकिशोर मोदी, अध्यक्ष माणिक वडवनकर, उपाध्यक्ष मनोज लखेरा ,संचालक कचरूलाल सारडा, सुनील वाघाळकर,रुपेश चव्हाण, ब्रम्हचारी इंगळे , शेख अब्दुल शेख करीम, शिरीष भावठाणकर, सय्यदअमजद , श्रीमती कल्याणी देशपांडे, जयश्री घाडगे, अ‍ॅड.दयानंद लोंढाळ, जावेद गवळी तसेच  व्यवस्थापक गजानन कुलकर्णी  हे उपस्थित होते. पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात श्री योगेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून  झाली . पतसंस्थेचे मागील वर्षीचे इतिवृत्त व्यवस्थापक गजानन कुलकर्णी यांनी सादर केले .त्यावेळी वार्षिक सभेपुढे येणार्‍या विविध विषयांवर चर्चा होऊन त्यावर मंजुरी घेण्यात आली.  याप्रसंगी पतसंस्थेचे संचालक ऍड दयानंद लोंढाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले .योगेश्वरी पतसंस्था ही सामान्य नागरिकांची आर्थिक नाडी बनल्याचे  त्यांनी सांगितले . शहरातील नागरिकांनी संस्थापक राजकिशोर मोदी यांच्यावर विश्वास टाकून आपला , कुटुंबाचा पर्यायाने आपल्या समाजाचा आर्थिक स्तर  उंचावून घेतला याबद्दल लोंढाळ यांनी अभिमान व्यक्त करताना मोदी यांचे अभिनंदन व कौतुक केले.तसेच ग्राहकांनी घेतलेले कर्ज वेळेवर परत करावे असे आवाहन देखील याप्रसंगी अ‍ॅड.दयानंद लोंढाळ यांनी केले.पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षीय भाषण सादर करताना पतसंस्थेचे अध्यक्ष माणिक वडवणकर यांनी पतसंस्थेचा इतिवृत्त सादर केला .यावेळी ते म्हणाले की संस्थेचे संस्थापक राजकिशोर मोदी यांचे बहुमूल्य नियोजनबध्द निर्णय व अभ्यासु मार्गदर्शन सतत पतसंस्थेस लाभत असल्याने पतसंस्थेची ओळख ही एका मिनिबँकेच्या रुपाने निर्माण झाली आहे.  राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाच्या बळावरच आज पतसंस्थेची यशस्वी घोडदौड सुरू असल्याचे माणिक वडवणकर यांनी नमूद केले. श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेची मार्च 2023 अखेर वित्तीय स्थिती मध्ये भाग भांडवल रुपये 2 कोटी 42 लाख, सभासद ठेवी 41 कोटी,तर पतसंस्थेच्या वतीने सभासद व ग्राहकांना कर्ज वाटप रुपये 33 कोटी एवढे झाले आहे . पतसंस्थेची  अंबाजोगाई पिपल्स बँकेकडे एकूण गुंतवणूक ही  रुपये 14 कोटी एवढी आहे .तर 31 मार्च 2023 अखेर पतसंस्थेस रुपये 70 लाखांचा निव्वळ नफा झाला आहे .तर आजमितीला पतसंस्थेकडे एकूण 2313 एवढे सभासद आहेत .तसेच संस्थेला लेखापरीक्षण होऊन ब वर्ग प्राप्त झाला असल्याचे पतसंस्थेचे अध्यक्ष माणिक वडवणकर यांनी सांगितले. साधारणपणे चौतीस वर्षापूर्वी एका छोट्याश्या खोलीत केवळ 10 हजार रुपयांच्या भाग भांडवलावर चालू करण्यात आलेली श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था आज एक वटवृक्षाच्या रूपाने उभा आहे. सभासद , ठेवीदार व ग्राहकांच्या अतूट विश्वासाच्या बळावर श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेने  दहा हजारावरून आज 40 कोटीचा टप्पा ओलांडला आहे . पतसंस्थेने  शहरातील शेकडो छोट्या छोट्या व्यवसाईक , हातगाडीवर भाजीपाला व फळविक्रेत्याना आर्थिक सहाय्य करून त्यांना त्यांचा व्यवसाय वाढ व कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत केली आहे . तसेच सन्माननीय सभासदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी , मुला मुलींच्या लग्नासाठी , घर बांधकाम करण्यासाठी तसेच नवीन जागा खरेदी करण्यासाठी देखील पतसंस्थेकडून वेळोवेळी आर्थिक मदत केली आहे . श्री योगेश्वरी नागरी पतसंस्थेची मातृबँक ही अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँक  म्हणून कार्यरत आहे . योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था ही आजच्या घडीला केवळ पतसंस्था राहिली नसून ती एक मिनी बँक म्हणूनच ओळखल्या जाऊ लागली आहे .पतसंस्थेने वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम देखील राबविले आहेत . त्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार , दिव्यांग व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेष व शैक्षणिक साहित्य , फराळ व फळवाटप असे विविध उपक्रम राबविले आहेत व यापुढेही असेच उपक्रम राबविण्यात येतील अशी भावना देखील पतसंस्थेचे अध्यक्ष माणिक वडवणकर यांनी व्यक्त केली. पतसंस्था नावारूपाला आणण्यासाठी पतसंस्थेचे ग्राहक , सभासद , ठेवीदार तसेच कर्जदार यांचा पतसंस्थेत मोलाचा वाटा आहे.तसेच पतसंस्थेचे संस्थापक राजकिशोर मोदी यांच्यासह सर्व  संचालक मंडळ ,कर्मचारी व पिग्मी प्रतिनिधी यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे अध्यक्ष माणिक वडवणकर यांनी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपल्या अध्यक्षीय भाषणात नमूद केले.आयोजित सर्वसाधारण सभेस पतसंस्थेचे महिला व पुरुष सभासद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.या वार्षिक सर्वसाधारण सभेचे संचलन आनंद टाकळकर यांनी केले तर उपस्थित पतसंस्थेचे संस्थापक राजकिशोर मोदी, सहायक निबंधक पोतंगले, त्याचबरोबर संस्थेचे ठेवीदार, कर्जदार, जामीनदार, सभासद व पतसंस्थेच्या सर्व ग्राहकांचे आभार पतसंस्थेचे संचालक कचरूलाल सारडा यांनी व्यक्त केले.

COMMENTS