Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विजेच्या लपंडावामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान

कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे, खा.डॉ. प्रितमताई मुंडे व पंकजाताई मुंडे यांना ग्रामस्थांचे निवेदन

परळी प्रतिनिधी - मुबलक पाणी उपलब्ध असतानाही सततच्या विजेच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या त्रासाला श

Lonand : साखरवाडी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मुजोरीपणा
सर्वोदय विद्यालयाचे तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धांत नेत्रदीपक यश
दोन सख्या बहिणींचा गोदावरीच्या पात्रात बुडून मृत्यू

परळी प्रतिनिधी – मुबलक पाणी उपलब्ध असतानाही सततच्या विजेच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या त्रासाला शेतकरी प्रचंड कंटाळून गेले आहेत. विजेची समस्या तात्काळ मार्गी लावून शेतकर्‍यांचा पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा यासाठी पिंपरी बू. च्या ग्रामस्थांनी सोमवारी राज्याचे कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांना निवेदन दिले.
कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी तात्काळ निवेदनाची दखल घेऊन संबंधित प्रश्न तात्काळ मार्गी लावावा असे निर्देश महावितरण कंपनीला दिले तर माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी दूरध्वनीवरून शेतकर्‍यांशी फोनवरून संवाद साधत प्रश्न मार्गी लागेपर्यंत आपण पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. पिंपरीच्या ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वरील विषयी अनुसरून की मौजे पिंपरी बु. हे गाव पोहनेर सबस्टेशन वरून जोडलेले आहे. शेतीपंपाची लाईट गेली दोन वर्षापासून पाच दहा पाच दहा मिनिटांनी ट्रिप होत असते. त्यामुळे शेतकर्‍याकडे मुबलक पाणी असूनही शेती पीक पाण्या वाचून वाळत आहेत. त्यामुळे सदरील गावातील शेतकर्‍यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या अगोदरही गावकर्‍यांनी वारंवार एम.एस. ई. बी. कडे तक्रार केलेले आहे. पिंपरी फिटर वर लोड होत असल्यामुळे प्रशासक यावर निष्काळजी दाखवत आहे . तरी आपल्याकडे विनंती आहे की पोहनेर सबस्टेशन वरून पिंपरी करिता वेगवेगळे दोन फिटर काढून देणेबाबत आपल्या स्तरावरून आदेशित करावे ही विनंती. तसेच पिंपरी साठी नवीन 33र्ज्ञीं सबस्टेशन मिळणे बाबत आपल्याकडे विनंती असल्याचे म्हटले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मणराव पौळ, वैद्यनाथ कारखान्याचे संचालक सुरेश माने, सरपंच माणिकराव पौळ, उपसरपंच गणेश आबा पौळ, बबनराव पौळ, अनिल माने, रमेश पौळ, वसंत राठोड, दत्तात्रय डिकले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटी सदस्य यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS