पुणे : अमली पदार्थांची तस्करी करणार्या तिघा परप्रांतीयांना अमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 17 लाख रूपये किं
पुणे : अमली पदार्थांची तस्करी करणार्या तिघा परप्रांतीयांना अमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 17 लाख रूपये किंमतीचे 5 किलो 816 ग्रॅम अफिम जप्त करण्यात आले आहे. यावर्षी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अफीमची कारवाई करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.
सुमेर जयरामजी बिष्णोई (वय 50 रा. कोंढवा-बुद्रुक), चावंडसिंग मानसिंग राजपुत, लोकेंद्रसिह महेंद्रसिह राजपुत (सर्व रा. राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या सूचनेनुसार पथक पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी कोंढवा बुद्रूक परिसरात एकजण अफीमची विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अंमलदार पांडुरंग पवार व सचिन माळवे यांना मिळाली. पथकाने सापळा रचून सुमेर बिष्णोई याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 64 लाख 28 हजारांचे अफिम जप्त करण्यात आले. चौकशीत त्याने दोघाजणांकडून अफिम घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने चावंडसिंग आणि लोकेंद्रसिह यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 52 लाखांचे अफिम जप्त करण्यात आले.
COMMENTS