Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 श्रेयश वराटची राष्ट्रीय सॅम्बो स्पर्धेसाठी निवड

श्रेयस वराट, रोहित थोरात,विशाल धोत्रे यांना सुवर्णपदक

जामखेड/प्रतिनिधी ःसॅम्बो असोशिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने औरंगाबाद जिल्हा सॅम्बो असोशिएशन आयोजित विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर येथे

सतोबा राऊत हे उद्योगभूषण व्याक्तिमत्त्व होय ः  प्रा. शिवाजीराव बारगळ
कामगार आयुक्त कार्यालयासमोर महिलांनी घासली व धुतली भांडी ; क्रांती असंघटित कामगार संघटनेचे आंदोलन
महापालिकेच्या वतीने पाईपलाईन रोड येथील चौकाचे कै.शंकरभाऊ वाणी नामकरण

जामखेड/प्रतिनिधी ःसॅम्बो असोशिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने औरंगाबाद जिल्हा सॅम्बो असोशिएशन आयोजित विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय सॅम्बो अजिंक्यपद स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये  सब-ज्युनिअर गटामध्ये आयडियल स्पोर्टस् अकॅडमी, जामखेडचा खेळाडू श्रेयस सुदाम वराट याने सुवर्णपदक मिळविले.सिनियर गटामध्ये रोहित थोरात व विशाल धोत्रे यांनी सुवर्णपदक तर संकेत मासाळ याने रौप्यपदक मिळविले.
सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची राष्ट्रीय सॅम्बो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व खेळाडूंना  प्रशिक्षक प्रा.लक्ष्मण उदमले व शाम पंडित यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या सर्व खेळाडूंचे आ.रोहित पवार, आ.प्रा.राम शिंदे, पोलिस निरीक्षक महेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर राळेभात, उमेश देशमथळ,प्राचार्य श्रीकांत होशिंग, मा.प्राचार्य श्रीराम मुरुमकरसह तालुक्यातील पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. व राष्ट्रीय सॅम्बो स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यातील रोहित थोरात हा आतंरराष्ट्रीय पातळीवर कझाकिस्तान येथे सँम्बो स्पर्धेत खेळला होता. तर मागील महिन्यात अमरावती येथे झालेल्या वुशू राज्यस्तरीय स्पर्धेत श्रेयस वराटने रौप्यपदक जिंकले होते.

COMMENTS