Homeताज्या बातम्यादेश

बाबा मी अजून जिवंत आहे…’ अंत्यसंस्कार केल्यानंतर मुलीचा व्हिडिओ कॉल

बिहार प्रतिनिधी - मुलीच्या मृत्यूने संपूर्ण परिवार शोकसागरात बुडाला होता. आई- वडिल नातेवाईक सर्वजण या दुर्देवी घटनेवर हळहळ व्यक्त करत कुटूंबाला

’मविआ’ कोणतीही फूट पडणार नाही ः खा.डॉ. अमोल कोल्हे
समलिंगी जोडप्याने दिला चक्क बाळाला जन्म
Mumbai : समीर वानखेडे चे वडील मुस्लिम – मौलाना

बिहार प्रतिनिधी – मुलीच्या मृत्यूने संपूर्ण परिवार शोकसागरात बुडाला होता. आई- वडिल नातेवाईक सर्वजण या दुर्देवी घटनेवर हळहळ व्यक्त करत कुटूंबाला धीर देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र अचानक ज्या मुलीचा अंत्यसंस्कार केले, त्याच मुलीने वडिलांना व्हिडिओ कॉल करुन मी जिवंत असल्याचे सांगितले आणि सगळेच हादरुन गेले. काळजाचा थरकाप उडवणारी, मन सुन्न करणारी आणि तितकीच चक्रावून टाकणारी ही घटना बिहारच्या पुर्णीया जिल्ह्यातील अकबरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, जाणून घेवूया

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुर्णिया जिल्ह्यातील अकबरपुरमधील अंशु कुमारी ही तरुणी महिनाभरापूर्वी अचानक गायब झाली होती. मुलगी अचानक गायब झाल्याने संपूर्ण कुटूंब चिंतेत पडले होते. तिच्या घरच्यांनी खूप शोध घेतला मात्र मुलीचा काही तपास लागला नाही. याबाबत पोलिसांमध्येही तक्रार दाखल करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात पोलिसांना एका स्थानिक कालव्यात एका मुलीचा मृतदेह सापडला. पाण्यात बुडाल्यामुळे मृतदेह इतका सुजला होता की त्याला ओळखणे जवळपास अशक्य होते. अंशुच्या घरच्यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर अंशूच्या कुटुंबीयांनी कपड्याच्या आधारावर मृतदेह तिचाच असल्याचे सांगितले. कुटूंबियांनी मुलीचा मृत्यू झाल्याचे समजत अंत्यसंस्कारही केले.

मात्र, अचानक ज्या मुलीचा अंत्यसंस्कार केला, तिचाच वडील विनोद मंडल यांना व्हिडिओ कॉल आला आणि संपूर्ण कुटूंब हादरून केले. यावेळी मुलीने तिच्या वडिलांना ती तिच्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी पळून गेली होती. सध्या ती पूर्णियाच्या बनमंखी ब्लॉकमधील जानकी नगर भागात तिच्या सासरच्या घरी राहत असल्याचे सांगितले. तो मृतदेह कोणाचा? मुलीच्या या व्हिडिओ कॉलनंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलघडा झाला. या चक्रावून टाकणाऱ्या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. दरम्यान, आता ज्या मुलीचा अंत्यसंस्कार केला, तो मृतदेह कोणाचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

COMMENTS