Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गेवराईतील ’गाव तेथे आरोग्य शिबीर’ ला बागपिंपळगावातून शुभारंभ

पहिल्याच दिवशी 350 जणांची नेत्र तपासणी

गेवराई प्रतिनिधी - गेवराई मतदारसंघात भारत राष्ट्र समिती पक्षाच्या पुढाकाराने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोफत गाव तेथे आरोग्य शिबीर राबविले

राहत्यात मविआकडून जोडे मोरो आंदोलन
टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण | LOKNews24
कर्ज महागले ; रिझर्व्ह बँकेने केली रेपो दरात वाढ

गेवराई प्रतिनिधी – गेवराई मतदारसंघात भारत राष्ट्र समिती पक्षाच्या पुढाकाराने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोफत गाव तेथे आरोग्य शिबीर राबविले जात आहे. या शिबिरात तज्ञ डॉक्टर नागरिकांची मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणार आहेत. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत कार्ड या आरोग्य शिबिरातून नागरिकांना दिली जाणार आहेत. दरम्यान या अभियानाचा शुभारंभ दै. कार्यारंभ चे कार्यकारी संपादक बालाजी मारगुडे, दै. लोकाशाचे आवृत्ती प्रमुख भागवत तावरे, दै.पुण्यभूमीचे कार्यकारी संपादक सुनील डोंगरे, मराठी महाराष्ट्रचे संपादक संग्राम धन्वे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत तालुक्यातील बागपिंपळगाव येथे शुक्रवार रोजी करण्यात आला. या शिबीराच्या पहिल्याच दिवशी बागपिंपळगाव व राजपिंप्री येथील तब्बल 350 जणांची नेत्र तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली.
बीआरएस पक्षाचे युवा नेते तथा बीएम प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के व गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयक मयुरीताई खेडकर-मस्के यांच्या पुढाकारातून व एच.व्ही. देसाई आय हाँस्पिटल व मानव कल्याण हितवादी सेवाभावी संस्था मुंबई यांच्या संयुक्त मोफत आरोग्य यज्ञ राबविण्यात येत आहे. गेवराई मतदारसंघात गाव तेथे आरोग्य शिबीर राबवून तब्बल 1 लाख नेत्र तपासणी व 11 हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प बाळासाहेब मस्के यांनी केलेला आहे. दरम्यान शुक्रवार दि.18 आँगस्ट रोजी सकाळी बागपिंपळगाव येथून या आरोग्य शिबीराचा शुभारंभ करण्यात दै. कार्यारंभ चे कार्यकारी संपादक बालाजी मारगुडे, दै. लोकाशाचे आवृत्ती प्रमुख भागवत तावरे, दै.पुण्यभूमीचे कार्यकारी संपादक सुनील डोंगरे, मराठी महाराष्ट्रचे संपादक संग्राम धन्वे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.  दरम्यान नागरिकांची मोफत नेत्र तपासणी शिबिरात केली जात आहे. यानंतर आवश्यक त्या रुग्णांवर नंतर टप्याटप्याने मोतीबिंदू शस्त्रक्रिया पुणे येथील एच.व्ही. देसाई आय हाँस्पिटल येथे करण्यात येणार आहेत. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत कार्ड या आरोग्य शिबिरातून नागरिकांना दिली जाणार आहेत. त्याचबरोबर बंद पडलेली संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेचा लाभ नागरिकांना दिला जाणार आहे, पी.एम. किसान सन्मान निधी योजनेची नविन नोंदणी देखील यामध्ये नागरिकांना करुन दिली जात आहे. दरम्यान शिबीराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती. शिबीराच्या पहिल्याच दिवशी बागपिंपळगाव, राजपिंप्री येथील 350 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर शिबीरात गोरगरीब रुग्णांवर उपचार होत असल्याने आयोजक बाळासाहेब मस्के, मयुरीताई खेडकर-मस्के यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी बीआरएसचे पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

COMMENTS