नवी दिल्ली/प्रतिनिधी ः आगामी 2024 मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी काँगे्रसने रणनीती आखण्यासोबतच पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सुरू क
नवी दिल्ली/प्रतिनिधी ः आगामी 2024 मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी काँगे्रसने रणनीती आखण्यासोबतच पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सुरू केला असून, काँगे्रसने रविवारी आपली 39 सदस्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली असून, यामध्ये जी-23 तील नेत्यांचाही समावेश केला आहे. यामध्ये काँगे्रस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह 39 नेत्यांचा समावेश आहे.
काँग्रेसवर नाराज असलेले आनंद शर्मा आणि शशी थरूर यांच्यासह जी-23 मधील अनेक नेत्यांनाही या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. या कार्यकारिणीची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. काँग्रेसमधील ही सर्वात मोठी निर्णय घेणारी समिती आहे. या नव्या कार्यकारिणीत फारसा बदल करण्यात आलेला नाही. यादी जाहीर करण्यापूर्वी गेल्या अनेक महिन्यांपासून बैठकांचे सत्र सुरू होते. याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या होत्या. या काँगे्रस कार्यकारिणीमध्ये मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी, ए. के. अँटनी, अंबिका सोनी, अधीर रंजन चौधरी, दिग्विजय सिंग, चरणजीत सिंग चन्नी, आनंद शर्मा यांच्यासह एकूण 39 नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय 32 स्थायी निमंत्रित, 9 विशेष निमंत्रित, युवक काँग्रेस, एनएसयूआय, महिला काँग्रेस आणि सेवादल अध्यक्षांनाही स्थान देण्यात आले आहे.
सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न – महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही यादी जाहीर करण्यात आली आहे. सचिन पायलट नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनाही या कमिटीमध्ये स्थान देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कमिटीमध्ये काँग्रेस कुटुंबियांसह मनमोहन सिंग यांच्याही समावेश आहे. काँग्रेस कमिटीकडून 32 स्थायी आमंत्रित सदस्य आणि 9 विशेष आमंत्रित सदस्यांचा समावेश आहे.
COMMENTS