Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात लवकरच सत्ताबदल ः वडेट्टीवार

सप्टेंबरमध्ये मुख्य खुर्ची बदलणार असल्याचा केला दावा

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यापासून अजि

वनपरिक्षेत्र हरसुल येथे अवैध वाहतूक करणारे वाहन जप्त
उदगीर नगरपरिषदेकडून एक विद्यार्थी एक झाड मोहीम
महाबळेश्‍वरवाडी येथे वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यापासून अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अशा वृत्त नाकारत एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहतील असे सांगितले. मात्र शनिवारी पुन्हा एकदा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यात सत्ता-बदलाचे संकेत दिले असून, सप्टेंबरमध्ये मुख्य खर्ची बदलेल असे म्हटले आहे.

माध्यमांशी बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, 15-20  दिवसांत राज्यात काय बदल होईल ते राज्य बघेल. सप्टेंबर महिन्यात मुख्य खुर्ची बदलेल, असे वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे आता त्यांचा हा रोख कुणाकडे होता, असा प्रश्‍न सध्या उपस्थित होऊ लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुंबईतील प्रसिद्ध वांद्रे येथील ताज हॉटेलमध्ये सर्व मंत्री आणि काही देशांचे कॉन्सिलेट जनरल यांना जेवणाचा निमंत्रण दिले होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले मात्र दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित न राहिल्यामुळे राज्यात अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. विरोधकांनी मात्र अजितदादांच्या अनुपस्थितीवरून सरकारवर टीका करण्याची संधी सोडली नसल्याच पाहायला मिळत आहे. यावूरन वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले,  15-20  दिवसांत राज्यात काय बदल होईल ते महाराष्ट्र  बघेल. बदल होणार आहे पण आमची सत्ता येणार नाही. मात्र  सप्टेंबर महिन्यात  राज्यातील मुख्य खुर्ची बदलेल.
दरम्यान, विजय वडेट्टीवार यांचा दावा भाजपचे प्रदेशाध्यख चंद्रशेखर बावनकुळे फेटाळला असून 2024 पर्यंत भाजपचा मुख्यमंत्री असणार असे सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,  ामच्या वरिष्ठांनी आधीच स्पष्ट केले आहे की आमचे मुख्यमंत्री 2024 पर्यंत राहणार आहेत. 2024 च्या निवडणूका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच लढल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले.

राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा – राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिके करपली आहेत, त्यामुळे राज्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्यात 22 दिवस झाले पावसाने दडी मारली. पीके संकटात आली. मराठवाड्यात धरणात फक्त 35 टक्के पाणी आहे. सरकारला शासनाला कोरडा दुष्काळ घोषीत करावा लागेल असे 11 जिल्हे आहेत. कोरड्या दुष्काळाचे पंचनामे करावे लागेल.सोयाबीनचा शेतकरी वार्‍यावर सोडला. संकटांमुळे शेतकर्‍यांना आत्महत्या करावी लागत आहे. सरकारने जबाबदारी स्वीकारुन काम करावे. यांचा एक आमदार मंत्रीमंडळात घेतले नाही म्हणून आत्महत्येची धमकी देतोय सरकारला शेतकर्‍यांची परवा नाही, असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी यावेळी केला.

COMMENTS