Homeताज्या बातम्यादेश

टॉमेटो आजपासून 40 रुपये किलो मिळणार

नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून टॉमेटोचे दर दोनशेच्या पार गेले होते, त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईनं अक्षरशः घाम फोडला आहे. पण सरकारने मह

तब्बल अठरा तासानंतर सांगली बाजार समिती परिसरातील गवा पकडला
आंतरराष्ट्रीय मल्ल घडविण्याचा प्रयत्न : आ. जयंत पाटील
पुसेगाव येथे बैलबाजार न भरल्याने शेतकरी अडचणीत

नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून टॉमेटोचे दर दोनशेच्या पार गेले होते, त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईनं अक्षरशः घाम फोडला आहे. पण सरकारने महागाईने पिचलेल्या सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. आजपासून (20 ऑगस्ट) देशभरात टॉमेटो प्रतिकिलो 40 रुपयांनी विकला जाणार आहे.
टॉमेटोच्या वाढत्या किंमतीला ब्रेक लागला आहे. सर्वसामान्याच्या अवाक्याबाहेर गेलेला टॉमेटो पुन्हा किचनमध्ये दिसू लागला आहे. देशात टॉमेटोचा भाव प्रतिकिलो 300 रुपयांवर पोहोचला होता. पण गेल्या 14 जुलैपासून सरकारने आखलेल्या योजनेनुसार, स्वस्तात टॉमेटो विक्री केला जात आहे. सुरुवातीला 90 रुपये किलो, नंतर 50 रुपये आणि आजपासून 40 रुपये किलोने टॉमेटो विकला जाणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार, घाऊक आणि किरकोळ बाजारात टॉमेटोच्या किंमतीत घसरण झाली असतानाच, सहकारी संस्था एनसीसीएफ आणि नाफेड 20 ऑगस्टपासून 40 रुपये प्रतिकिलोने टॉमेटो विक्री करणार आहे. सरकारकडून दुसर्‍या उत्पादक राज्यांतून टॉमेटो खरेदी करून दिल्ली एनसीआरसह अन्य राज्यांत स्वस्तात विक्री करण्याची योजना आखली होती. ग्राहक व्यवहार विभाग, एनसीसीएफ, नाफेडने आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांतून टॉमेटो खरेदी करून ज्या राज्यांत टॉमेटोचा भाव गगनाला भिडला होता, त्या ठिकाणी विकला. रिपोर्टनुसार, 14 जुलैपासून आतापर्यंत नाफेड आणि एनसीसीएफने देशात 15 लाख किलो टॉमेटो खरेदी करून तो स्वस्तात विकला आहे.

COMMENTS