Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विलेपार्ले, चेंबूरमध्ये पुस्तक विक्री केंद्रे सुरू

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहाच्या परिसरात, तसेच चेंबूरमधील जलतरण तलावाच्या परिसरात पुस्तक विक्री केंद्र सुरू के

आमदार प्रणिती शिंदेंनी पंतप्रधानांना पाठवलं पोस्टकार्ड
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.
विश्‍वनाथ कातोरे यांचे निधन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहाच्या परिसरात, तसेच चेंबूरमधील जलतरण तलावाच्या परिसरात पुस्तक विक्री केंद्र सुरू केले आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या दोन्ही पुस्तक विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
मुंबई महानगरपालिकेची नाट्यगृहे आणि जलतरण तलावांच्या परिसरात पुस्तक विक्रीसाठी प्रकाशकांना सशुल्क जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी प्रकाशकांना आवाहन करण्यात आले होत. प्रकाशकांकडून प्रतिसाद मिळल्यानंतर आता विविध ठिकाणी पुस्तक विक्री केंद्र सुरू करण्यात येत आहेत. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून 27 फेब्रुवारी रोजी बोरिवलीमधील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात मॅजेस्टिक प्रकाशनचे पुस्तक विक्री केंद्र सुरू करण्यात आले. त्यानंतर आता मंगळवारी स्वातंत्र्यदिनी विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहाच्या परिसरात ज्योत्सना प्रकाशनला पुस्तक विक्री केंद्रासाठी जागा देण्यात आली असून पहिल्याच दिवशी या केंद्राला वाचक रसिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

COMMENTS