Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाऊस नसल्यामुळे खरीपाची पिके धोक्यात

तलवाडा प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील गेल्या काही दिवसापासून पावसाचा खंड पडल्यामुळे खरिपाच्या पिकांनी कोरडवाहू जमिनीतील माना टाकल्य

गेवराई तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतपिकांची पालकमंत्र्यांकडून पहाणी
हळदीवर अडत्या जीएसटी न आकारण्याचा निर्णय
विजयादशमीनिमित्त झेंडूची फुले ऐंशी ते शंभर रुपये किलो (Video)

तलवाडा प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील गेल्या काही दिवसापासून पावसाचा खंड पडल्यामुळे खरिपाच्या पिकांनी कोरडवाहू जमिनीतील माना टाकल्या आहेत तर काही ठिकाणी पिके सोसाट्याच्या वार्‍यामुळे सुकू लागले आहेत सतत ढगाळ वातावरणामुळे व रिमझिम पावसामुळे कापूस बाजरी मका तूर आधी पिकांचे वाढ खुंटलेली आहे तर ढगाळ वातावरणामुळे कपाशीवरील रोगाचा प्रादुर्भाव पडलाय तर बुरशीजन्य रोगांच्या अटॅक झाल्यामुळे मावा व बुरशीचे प्रमाण वाढले आहे. यावर्षी खरीप हंगामाची दुष्काळ दृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहेत सोयाबीन पीक एक ते दीड महिन्याचे झाले आहे ढगाळ वातावरण रिमझिम पावसामुळे पिकाची वाढ खुंटली आहे तर कापसावरील मावा अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने कापसाचे पीक धोक्यात आले आहे तीन महिन्याची पिकामध्ये मुग सोयाबीन तूर बाजरी हे मात्र एक प्रकारचे नामशेष होते की काय म्हणून शेतकरी हवालदार झाला आहे

COMMENTS