Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने साडेसोळा लाखांचा गंडा

पुणे/प्रतिनिधी ः टेलिग्रामच्या माध्यमातून पुण्यातील केसनंद परिसरात राहणार्‍या एका तरुणाला अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला त्यानंतर तास जॉब वर्क फ्र

‘मी अध्यक्ष’ असल्याची थाप मारत भामट्याने चक्क विकली शाळा.
डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकाला एक कोटींचा गंडा
सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकास साडेसात लाख रुपयांचा गंडा

पुणे/प्रतिनिधी ः टेलिग्रामच्या माध्यमातून पुण्यातील केसनंद परिसरात राहणार्‍या एका तरुणाला अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला त्यानंतर तास जॉब वर्क फ्रॉम होम राहून पैसे कमवता येईल असे सांगत वेगवेगळे टास्क देऊन तब्बल 16 लाख 78 हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडण्यात आले.
मात्र, कोणत्याही प्रकारचा परतावा न देता सदर रकमेची फसवणूक करत ऑनलाइन गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजेंद्र राजू पाटील (वय-29, राहणार -तळेरानवाडी, थेऊर रोड, केसनंद, पुणे)यांनी अज्ञात मोबाईल क्रमांक धारक तसेच टेलिग्राम युजर आणि विविध बँक खातेधारक यांच्या विरोधात लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदरचा गुन्हा 30 एप्रिल 2023 ते 16 मे 2023 यादरम्यान ऑनलाइन स्वरूपात घडला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार राजेंद्र पाटील यांना एका मोबाईल क्रमांक वरून सुरुवातीला फोन आला. सदर व्यक्तीने पाटील यांना टास्क जॉब वर्क फ्रॉम होम राहून अल्पावधीत चांगल्या प्रकारे पैसे कमवता येईल असे सांगितले. एका टेलिग्राम ग्रुपमध्ये तक्रारदार यांचा क्रमांक समाविष्ट करून त्यांना इतरांना कशाप्रकारे लाभ मिळत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानुसार व्हाट्सअप व टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क करून विश्‍वास संपादन करून फॉलो आणि लाईकचा टास्क ट्रेडिंग टास्क पूर्ण करायला लावणे तसेच ते मिळवण्याकरता खाती व्हेरिफाय करायच्या नावाखाली वेगवेगळे चार्जेस सांगून 16 लाख 78 हजार रुपये विविध बँक खात्यावर भरण्यास सांगितले. मात्र, सदर पैसे भरल्यानंतर कोणत्याही प्रकारचा परतावा न करता तसेच कमवलेले पैसे न देता फसवणूक करण्यात आलेली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस कोळपे पुढील तपास करत आहे.

COMMENTS