Homeताज्या बातम्यामनोरंजन

अंकिता लोखंडे दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात

ख्रिश्चन पद्धतीने पार पडला सोहळा

मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे पवित्रा रिश्ता मालिकेतून घराघरात पोहोचली. अंकिता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ती नेहमीच व

राज्यात तयार होणार लम्पी प्रतिबंधक लस
अणुऊर्जा क्षमता 2031-32 पर्यंत तिप्पट होईल
राष्ट्रवादीच्या यात्रेची आमदार काळेंकडून जय्यत तयारी

मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे पवित्रा रिश्ता मालिकेतून घराघरात पोहोचली. अंकिता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ती नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. आता अंकिता लोखंडे दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली आहे. नुकतंच तिने याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. अंकिता लोखंडने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना तिने “आम्ही पुन्हा विवाहबंधनात अडकलो”, असे म्हटले आहे. अंकिताने तिचा पती विकी जैनबरोबर ख्रिश्चन पद्धतीने पुन्हा एकदा लगीनगाठ बांधली आहे. या व्हिडीओत विकी हा रोमॅटिक पद्धतीने गुडघ्यावर बसून अंकिताला प्रपोज करताना दिसत आहे. यानंतर ते दोघेही एकमेकांना लिप किस करतानाही पाहायला मिळत आहेत. अंकिताने यावेळी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. तर विकीने पांढऱ्या रंगाचा थ्री पीस सूट परिधान केला होता. यावेळी ते दोघेही फारच मस्त दिसत होते. अंकिताने शेअर केलेल्या या व्हिडीओवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. अनेकांनी त्यांना ‘बेस्ट कपल’, ‘फार सुंदर’, ‘मस्त’, असे म्हटले आहे. दरम्यान अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी १४ डिसेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अंकिता आणि विकी गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. काही दिवसांपूर्वी ती गरोदर असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र त्यावर तिने स्पष्टीकरण देत “मी गरोदर नाही”, असं म्हटले होते.

COMMENTS