अमरावती/प्रतिनिधी : आमदार आणि प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू राज्य सरकारमध्ये सहभागी असूनही त्यांनी बुुधवारी शेतकर्यांच्या मागण्यांसाठी
अमरावती/प्रतिनिधी : आमदार आणि प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू राज्य सरकारमध्ये सहभागी असूनही त्यांनी बुुधवारी शेतकर्यांच्या मागण्यांसाठी 9 ऑगस्ट क्रांती दिनी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अमरावती विभागीय कार्यालयावर ’जन एल्गार मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या जन एल्गार मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकर्यांच्या शेतातील कामे रोजगार हमी योजनेतून व्हावे, नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना 50 हजार अनुदान द्यावे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना भरघोस मदत द्यावी, कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी शांततेत सकाळी 11 वाजता भव्य मोर्चा संत गाडगेबाबा समाधी मंदिर वरून निघला. यामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. आता लढल्याशिवाय मी राहणार नाही. आता आंदोलन करावं लागेल. आमची युती कोणासोबत नाही झाली तरी, चालेल आता आपली संघटना दहा पट वाढली पाहीजे असं काम करायचं आहे.’’ तीन महिन्यात जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर शेतकर्यांच्या कुटुंबांना घेऊन आता आंदोलन करणार असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी एल्गार मोर्चा काढला. आमदार बच्चू कडू यांच्यासोबत हजारो प्रहारचे कार्यकर्ते चांदूरबाजार येथून अमरावतीसाठी रवाना झाले. चांदूरबाजारमध्ये प्रहरच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हा मोर्चा अमरावती विभागीय कार्यालयावर धडकला. शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेनं हा भव्य मोर्चा पुकरला.
सत्तेत असणे म्हणजे मान खाली घालून वागणे नव्हे – आमदार बच्चू कडू यांनी या आंदोलनादरम्यान बोलतांना सांगितले की, ‘आमच नाते जात आणि धर्माशी नाही तर आमचे नाते दुःखी लोकांशी आहे. आजच्या मोर्चा इथपर्यंत मर्यादित नाही आम्ही महाराष्ट्र पिंजून काढू’ सरकारमध्ये आहे म्हणून मोर्चा काढायचा नाही. प्रश्न सत्तेचा नाही, सत्तेत असणे म्हणजे खाली मान घालून वागणे नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. हा मोर्चा हजारोंचा आहे पुढील लाखो लोकांचा असेल. आमदार बच्चू कडू यांनी सांगितले की,’आता मी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करणार आणि जनतेला जागृत करण्याचे काम मी आता करणार आहे.
COMMENTS