Homeताज्या बातम्याविशेष लेख

गावठी पाहुणचार तरीही वर्षभरात दोनदा सलाईची वेळ दैनंदीन जीवनाची झाली दशा

भेसळयुक्त आहार शैली घातकच

साधारण १० ते १५ वर्षापूर्वी देखील नैसर्गिक प्रगल्भता या पृथ्वीवर बघावयास मिळत होती. २००५ नंतर डिजिटल हँडसेट लोकांच्या हातात पडले आणि भारतीय म

उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी विषारी नाग
शिवसेना नेत्याच्या घरावर धाड | LOKNews24
हत्यारबंद दरोडेखोरांचा भर दिवसा बँकेवर दरोडा… पिस्तुल लावून लुटले (Video)

साधारण १० ते १५ वर्षापूर्वी देखील नैसर्गिक प्रगल्भता या पृथ्वीवर बघावयास मिळत होती. २००५ नंतर डिजिटल हँडसेट लोकांच्या हातात पडले आणि भारतीय मानवाने झपाट्याने उत्क्रांती केली। भारतीय बाजारपेठा खुलल्या त्यांना तेजी आली.पैशाचे डिमांड वाढले आणि मग प्रत्येकाच्या हातात भरमसाठ चलन फिरण्यास सुरुवात झाली। जास्त चलन मिळू लागल्यावर शांत बसेल तो माणूस काय ?  ५० ते ६० दरम्यान अथवा च्या पुढचे वयस्कर मंडळी आहेत त्यांचे खरोखर जीवन सुखात गेल्याचे त्यांच्या हौसी चेहऱ्यावर दिसून येते. कुठून आणायचे एवढी एनर्जी , एन म्हातारपणात देखील खमखमून भरलेली प्राण शक्ती सध्या आमच्या पिढीत अजिबात दिसून येत नाही.त्याचे कारण देखील तसेच आहेत भारतीय पद्धतीचा पौष्टीक खाद्यपदार्थ त्यांकडे आपोआप येत.मौजमस्तीचे जेवण नाही मात्र धान्य देखील पूर्णता ऊर्जा देणारे होते. आता तर गावठी लाल ज्वारी दिसत नाही सगळं हायब्रीड झाल्याने आपल्या बोलण्याच्या लकबी देखील हायब्रीड झाल्या आहेत. ३० – ४०  वय वर्ष असणारी मंडळी सहज तोलून जाऊ शकते परंतु नंतर असणाऱ्या उत्पत्तीचे जास्तच काही खरे वाटत नाहीत.

आधुनिक भारतीय तंत्रज्ञानाच्या युगातील आम्ही सर्व मंडळी बघतो आहोत की सर्व पटापट संपत चाललेले नैसर्गिक खनिज द्रव्य आता परत परत मिळणार नाहीत.त्यामुळे गावठी जेवणाच्या पध्दतीत फारसा काही फरक पडणार नाहीत. सध्या कितीही प्रमाणात गावठी आहार घेतला तरी तो आहार च नाहीत जे आजोबा सांगतात.असो सध्या असलेला गावठी आहार माणसाला दुर्लभ बनवत चाललेला आहेत.पूर्वीचे कुपोषण आणि आहार घेऊन झालेले कुपोषण यात काही फारसा फरक जाणवत नाहीत. आत्ताचे कुपोषण आपल्या शरीरासह बुध्दीचे देखील होत आहेत. तशी याची विविधांगी कारणे आहेत.परंतु भारतीय संस्कृतीत सध्या तरी काय भेसळ नाही असे विचारा म्हणजे थोडक्यात सांगता येईल. सर्वच ठिकाणी प्रचंड भेसळ आहेत. दुग्धजन्य पदार्थ , यांची तर पार वाट लागल्याचे सध्या तरी भारतात दिसतं आहेत. भाजीपाला हा भरपूर म्हणजे १०० % केमिकल युक्त फवारण्या केलेला आहेत।त्यामुळे अनैसर्गिक जीवनपद्धती आपक्या मानवी जीवनात येऊ घातली आहेत.आहार मुळात सध्या कुपोषित असल्याने दवाखान्यात गर्दी मावत नसल्याचे भयानक वास्तव समोर जरी असले तरी विज्ञानयुगात धडपडून जगणारे आपण आज कुठेतरी चुकतो आहोत. खरे तर जगाशी तुलना करणे आपले काम नाहीच तरी देखील हा प्रचंड मोठा बदल बघणारी आमची पिढी मोठे तोंड करून पहात आहेत. असो….अनैसर्गिक जेवन व खाद्यपदार्थ यांमुळे उत्पन्न होणारे आजार यामुळे माणूस शारीरिक पिडा सहन करत आहेत. तेल, दूध , भाजीपाला , अंडी , पाणी , डाळी , अंगाचे साबण , शाम्पू , किराणा , गृहपायोगी वस्तू सर्वच भेसळ असल्याने मानवी डोके बंद पडू लागली आहेत. कुठल्याच गोष्टीत अतिप्रमाणात कॅलरीज दिसून नाही येत प्रत्येक गोस्ट हायब्रीड म्हणजे माणवकृत झाल्याने त्याचे साईड इफेक्ट्स दिसू लागले त्यामुळे आमची बुद्धीची समरणशक्ती हरवली.आमच्यात आता व्याभिचार वाढल्याने विज्ञान जरी पुढे गेले असले तरी आमची अधोगती स्पष्ट दिसून येत आहेत.

कौटुंबिक ताणतणाव वाढत चालले 

गावठी जेवणाच्या नादात पैसे ओसांडून दिले जाते.

पूरक आहार व व्यायाम याकडे दुर्लक्ष 

दररोज होणारी धावपळ 

वैयक्तिक दुर्लक्ष 

कस्ट करण्याची प्रवृत्ती संपली 

परोपकारी भावना नाही 

डिजिटल व्यवस्थेने दिलेली कामोत्तेजक चित्रफिती 

पती आणि पत्नी यांतील वाढता दुरावा 

नाते संबंध जोपासली जात नाहीत 

अविश्वासू वृत्ती 

शासकीय व्यवस्था आणि नागरिक यांनी सांगड घालणे गरजेचे – कुठलीही व्यवस्था असो मग आपण काय आणि आपले शासन काय ? शासन म्हणजे काय आपण च आपल्या जीवनाला व्यवस्थित आयाम यावा या करिता एका हातातून दुसऱ्या हातात चालविण्यासाठी तयार करून दिलेली व्यवस्था !  मग आपणच आपली व्यवस्था ठीक करायला हवी जागरूक नागरिक बनणे हिताचे ठरेल. शासकीय यंत्रणेने जागरूक पणे भेसळयुक्त घटकांचे अवास्तव मोडीत काढल्यास मानवी जीवनावर नक्की चांगला परिणाम जाणवेल.परंतु ज्या अति महत्वाच्या नसून त्यांना मार्केटिंग ला वाव मिळेल तर अबुद्धिजीवी त्याच्या नक्कीच आहारी जाऊन आपले जीवन संपवेल. शासकीय यंत्रणा सक्रिय होणे गरजेचे आहेत.आता गरज आहेत.

योगेश रोकडे नाशिक  ९४२२८९२१९८

COMMENTS