Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत ’शिव शारदा पब्लिक स्कूल’ अजिंक्य..!

गेवराई प्रतिनिधी - क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याद्वारे संचलित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड तथा जिल्हा क्रीडा

अक्षराला घेऊन अधिपती चढणार खंडेरायचा गड, सुरु होणार मास्तरीण बाईंचा नवा संसार
ईडीकडून मंगलदास बांदल यांना अटक  
पराभवाने खचू नका, पुन्हा जोमाने कामाला लागा

गेवराई प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याद्वारे संचलित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड तथा जिल्हा क्रीडा परिषद बीड यांच्या विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेत गढी येथील शिव शारदा पब्लिक स्कूलने 14 व 17 वर्षाखालील वयोगटात विजेतेपद पटकावले. 14 वर्षाखालील संघाने अंतिम सामन्यात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ला 3/0 अशा फरकाने पराभव करीत विजेतेपद पटकावले तर 17 वर्षाखालील संघाने ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलचा 4/0 ने पराभव करीत विजेतेपद पटकावले. शाळेच्या दोन्ही संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे, अशी माहिती शाळेचे कर्तव्यदक्ष प्राचार्य कॅप्टन दास पिल्लई यांनी दिली. या दोन्ही संघाना राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू व फुटबॉल प्रशिक्षक नविद माशाईक यांनी अथक परिश्रम घेतले.
शिव शारदा पब्लिक स्कूलने  मिळवलेल्या या अद्वितीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.शिवाजीराव दादा पंडित, अध्यक्ष मा.अमरसिंह पंडित, सचिव मा.जयसिंग पंडित, माजी जि. प.अध्यक्ष विजयसिंह पंडित, युवा नेतृत्व मा.रणवीर पंडित, मा. पृथ्वीराज पंडित, शाळेचे कर्तव्यदक्ष प्राचार्य कॅप्टन दास पिल्लई, क्रीडा शिक्षक काळे सर,नविद माशाईक, शिक्षिका श्रीमती विद्या राठोड, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
—————-

COMMENTS