गेवराई प्रतिनिधी - तेलंगणा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी ऐतिहासिक निर्णय घेत, तेलंगणातील शेतकर्यांची 19 हजार कोटी रुपयां
गेवराई प्रतिनिधी – तेलंगणा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी ऐतिहासिक निर्णय घेत, तेलंगणातील शेतकर्यांची 19 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली आहे. सरकारच्या या क्रांतिकारी निर्णयाचे गेवराई तालुक्यात पाच हजार लाडू वाटप करून स्वागत केल. सदरील लाडू वाटपाचा कार्यक्रम भारत राष्ट्र समिती जनसंपर्क कार्यालय गेवराई या ठिकाणी 4 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता गेवराई मतदार संघाच्या समन्वयक मयुरीताई बाळासाहेब भाऊ मस्के-खेडकर यांच्या नियोजनातून करण्यात आला.
तेलंगणा राज्यात शेतकरी यांना आग्रस्थानी ठेवत शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात येत असून तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांनी 19 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याचा एतिहासिक निर्णय घेतला या निर्णयाचे गेवराई तालक्यात बाळासाहेब मस्के आणि मयुरीताई खेडकर – मस्के यांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी पाच हजार लाडू गेवराई शहरात शेतकरी आणि नागरिक यांना वाटप करन्यात आले यावेळी आपकी बार किसान सरकार महाराष्ट्रातील सरकार ला सद्बुद्धी देवो अशा घोषणा देण्यात आल्या या लाडू वाटप कार्यक्रमास गेवराई सह तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS