Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पूर्वग्रह दूषित निलंबन तात्काळ रद्द करून डॉ.सुरेश साबळे यांना पुन्हा सेवेत घ्या-सय्यद सैफ

बीड प्रतिनिधी - जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांचे राज्य शासनाने केलेले निलंबन तात्काळ रद्द करून पुन्हा सेवेत घ्यावे अशी मागणी एआयएमआ

मध्यरात्री नागरिकांना लुटणारी टोळी जेरबंद
डोळ्यात मिरचीपूड टाकली आणि केले हे कृत्य | LOK News 24
ऑक्सिजन देणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी लोकचळवळ निर्माण व्हावी :- फिरोजभाई पठाण

बीड प्रतिनिधी – जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांचे राज्य शासनाने केलेले निलंबन तात्काळ रद्द करून पुन्हा सेवेत घ्यावे अशी मागणी एआयएमआयएम पक्षाचे जिल्हा समन्वयक सय्यद सैफ अली उ़र्फ लालू भैय्या आणि शहराध्यक्ष शिवाजी भोसकर यांनी केली आहे. बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांचे निलंबन आमदार पडळकर, पालकमंत्री सावे आणि आरोग्यमंत्री सावंत या तिघांनी मिळून घटनाबाह्यरित्या केले आहे. ज्या कारणास्तव निलंबन केल्याचे सांगितले गेले त्या कारणाची कुठलीही चौकशी न करता सभागृहात फक्त पडळकर यांनी प्रश्न उपस्थित करताच सावे यांच्या मर्जीनुसार आरोग्यमंत्री सावंत यांनी तडकाफडकी डॉक्टर साबळे यांना निलंबित करत असल्याचे जाहीर करून टाकले. या त्रिकुटाने केलेल्या या कांडामागे नक्कीच काहीतरी काळेबेरे असल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच वर्ग एक पदावर असलेल्या डॉक्टर साबळे सारख्या कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांना अशा प्रकारे निलंबित करण्यात आले. याप्रकारे तर कार्यालयातील चपराशाला सुद्धा निलंबित करण्यात येत नाही. शासनाचा हा निर्णय रुग्णांसह बीड जिल्हावासियांवर अन्याय करणारा असून निलंबनाचा निर्णय रद्द करून डॉक्टर साबळे यांना तात्काळ पुन्हा बीड जिल्हा शल्य चिकित्सक पदावर सेवेत घ्यावे. अशी मागणी एआयएमआयएम पक्षाचे जिल्हा समन्वयक सय्यद सैफ अली उ़र्फ लालू भैय्या आणि शहराध्यक्ष शिवाजी भोसकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

COMMENTS