Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिलोलीत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची विविध  ठिकाणी जयंती साजरी  

बिलोली प्रतिनिधी - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती शहरात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला  बिलोली येथील साठे नगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ

ठाणे आगारातर्फे मसूर-ठाणे बससेवा सुरु
वाकडेवाडी परिसरात उलटला मेट्रोचा कंटेनर
म्युकरमायकोसीसवरील इंजेक्शनच्या ६० हजार व्हायल्स होणार उपलब्ध : राजेश टोपे

बिलोली प्रतिनिधी – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती शहरात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला  बिलोली येथील साठे नगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरीकरण्यात आली . सर्वप्रथम लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन बिलोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रायपल्ली मॅडम व बिलोली नगरीचे माजी नगराध्यक्ष भीमरावजी जेठे   इंद्रजीत  तूडमे यांनी केले त्यानंतर ध्वजारोहण रायफल्ली मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर या ठिकाणी राष्ट्रगीत घेण्यात आले . या कार्यक्रमास शहरातील पत्रकार नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते . प्रामुख्याने  प्रकाश पोवाडे संजय जाधव धम्मपाल जाधव उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष मधुकर कुडके उपाध्यक्ष करण कुडके सचिव सुधीर जिथे सहसचिव शुभम जेठे कोषाध्यक्ष अविनाश जेठे नागेश जेथे काशिनाथ आर से जयंती मंडळाचे मार्गदर्शक म्हणून मुकिंदर कुडके व संदीप कटारे होते.
त्यानंतर देशमुख येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरा करण्यात आली प्रतिमेचे पूजन आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांनी केले या कार्यक्रमास उपस्थित बिलोली नगर नगरीचे माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे विजय कुंचनवार इंद्रजीत तुडमे राजू गादगे प्रकाश पोवाडे संजय जाधव धम्मपाल जाधव मुन्ना पोवाडे पत्रकार वलोदिन फारुकी संदीप कटारे मुकुंदर कुडके उपस्थित होते ध्वजारोहण जेष्ठ नागरिक बैल के व मोहन जाधव यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर राष्ट्रगीत घेण्यात आले हा कार्यक्रमासाठी यशस्वी करण्यासाठी देशमुख नगर जयंती मंडळाचे पदाधिकार्‍यांनी योगदान दिले.त्यानंतरऑटो युनियन तर्फे नवीन बस स्टॅन्ड समोर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित जागेवर 103 वी जयंती साजरा करण्यात आली सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर त्यानंतर ध्वजारोहण बिलोली नगरीच्या माजी नगराध्यक्ष यादव रावजी तुडमे  व मंगेश भाऊ कदम यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास उपस्थिती म्हणून  बळेगावे ज्योती मॅडम महिला उपनिरीक्षक भीमराव जेठे विजय कुंचनवार इंद्रजीत तुड मे  महेंद्र गायकवाड प्रकाश पोवाडे संजय जाधव धम्मपाल जाधव मुन्ना पोवाडे लक्ष्मण शेट्टीवार वाढ पत्रकार राजेंद्र कांबळे पत्रकार एडके पत्रकार जी कुरेशी पत्रकार संजय पोवाडे  उपस्थित होते   मंगेश कदम यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा या  ठिकाणी झाला पाहिजे त्या पुतळ्यास माझ्या कडून पन्नास हजार रुपये पुतळ्यास देण्या चे जाहीर केले  त्यानंतर भीमराव जेठे यांनी सुद्धा पुतळ्यास 50 हजार रुपये देण्याचे जाहीर केले त्यानंतर यादव रावजी तुड मे यांनी एक लाख रुपये देण्याचे जाहीर केले प्रकाश पोवाडे  यांनी अकरा हजार रुपये देण्याचे जाहीर केले विजय कुंचनवार एकवीस हजार रुपये देण्याचे जाहीर केले  ही जयंती  यशस्वी करण्यासाठी हनुमंत कुडके संदेश जाधव शुद्ध धन जाधव गौतम जाधव संभाजी सोमवारी माधव कुडके आकाश जाधव विलास घोडके इंगळे मल्लापुरकर बालाजी सोमवारी नितीन कुडके व मार्गदर्शक म्हणून मुकिंदर कुडके व संदीप कटारे यांनी कार्य केले. त्यानंतर बिलोली बस आगार मध्ये 103 वी जयंती साजरा करण्यात आली त्यानंतर बिलोली तहसील कार्यालयावर समोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरा करण्यात आली.  त्यानंतर सायंकाळी साठेनगर येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

COMMENTS