Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उदगीर नगरपरिषदेकडून एक विद्यार्थी एक झाड मोहीम

उदगीर प्रतिनिधी - मागील आठवड्यापासून शहर व परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने उदगीर नगरपरिषदेकडून यावर्षी वृक्षलागवड मोहीम नियोजनेस सुरुवात झाली आ

कोपरगाव शहरात श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन
नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
कान चित्रपट महोत्सवात भारत पर्व ठरला सोहळ्याचे आकर्षण

उदगीर प्रतिनिधी – मागील आठवड्यापासून शहर व परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने उदगीर नगरपरिषदेकडून यावर्षी वृक्षलागवड मोहीम नियोजनेस सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या आदेशाने मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी वृक्ष लागवड मोहिमे मध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्याचे ठरले आहे.
शहरातील प्राथमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांना वृक्षलागवडीचे महत्व सांगून त्यांना नगरपरिषद अधिकारी कर्मचारी यांनी विविध प्रजातीच्या बिया गोळा करून ठेवल्या होत्या. प्रति विद्यार्थी एक पिशवी व दोन बिया देऊन विद्यार्थ्यांनी सदर पिशवी व बिया घरी नेऊनकिंवा शालेय परिसरात किंवा अन्यत्र त्याची लागवड करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्वर्धीनी माध्यमिक विद्यालय 3201, विद्यावर्धनी प्राथमिक विद्यालय 1020, विद्यावर्धनी इंग्लीश स्कूल 230, लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालय 750, लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय 2389, जमहूर उर्दू विद्यालय 980, अल अमीन उर्दू विद्यालय 1004, सरदार वल्लभभाई पटेल 700, असे एकूण 10274 विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक पिशवी आणि विविध प्रजातीच्या दोन बिया वितरीत करण्यात आल्या. या मोहिमेसाठी नगरपरिषदेचे वृक्ष विभाग प्रमुख अतुल तोंडारे यांच्यासह माधव शिंंदे, इस्माईल शेख, अनिल महापुरे, शिवशंकर मटके, मिस्बाह सद्दिकी, महारुद्र गालट, विशाल गुडसूरकर आदींनी परिश्रम घेतले.

COMMENTS